आईचे वय, त्या अनुषंगाने आलेली हालचालींवर मर्यादा व सध्याचे कॉरोनामुळे त्यात झालेली गुंतागुंत व या वयाच्या लोकांमध्ये सध्या कोणाचीच भेट होत नसल्याने निर्माण झालेले थोडे नैराश्य ही घरोघरची गोष्ट आहे. गेल्या वर्षी आमच्या घरचा केंद्रबिंदू असलेला जिवाभावाचा सर्वांचा लाडका, आमचा चतुष्पाद पुत्र वार्धक्याने निजधामास गेला. तो एक मोठाच धक्का सगळ्यांनाच बसला. पिल्ले पण घरटे सोडून पसार झालेली. घरात एक प्रकारे रितेपणा आला. मग मी संगीताचा आणि ज्ञानेश्वरीचा आधार घेतला. रोज सामूहिक ज्ञानेश्वरीचे पारायण, त्याआधी व नंतर संगीत ब्लूटूथ स्पीकर वर लावून सुंदर स्वरांनी घरातील वातावरण बदलून टाकायचे असे करू लागलो.
त्याचा एकदम मस्त परिणाम झाला. काहीसे एकलकोंडेपण नाहिसे होऊन घर परत चैतन्यमय झाले. आज अठराव्या अध्यायाची सुरुवात करून, त्यातील पहिल्या गुरुस्तुती च्या ओव्यांच्या क्लिष्ट संधींची फोड करताना झालेली तारांबळ कशीबशी सांभाळत मी हुश्श करून बसलो. जेवायला अजून वेळ होता, म्हणून मी मागे यमन लावला. रात्रीच्या पहिल्या प्रहरात वाजविला व गायला जातो असा हा एक अप्रतीम राग. मला पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची एक यमन मधील अद्वितीय जुगलबंदी सापडली. दोघेही १९७७-७९ मध्ये कित्येक वेळा माझ्या कॉलेजमध्ये येऊन आम्हां कानसेनांना तृप्त करून गेले होते. योगायोगाने त्यावेळी दोघेही झाकीर हुसेन ला घेऊन आले होते. झाकीर तेव्हा २५-२६ वर्षांचाच होता, पण त्या वयातच त्याची तयारी अशक्य कोटीतील होती! खानसाहेब अल्लारखा खानचे पट्टशिष्य, मोठे चिरंजीव आणि खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी. झाकीर हुसेन चे दोन्ही भाऊ तौफिक कुरेशी आणि फझल कुरेशी दोघेही अप्रतिमच आहेत, पण झाकिरसाहेबांचा रथ इतर सर्वांच्या चार बोटे वरच चालतो. त्यावेळी MLT मध्ये साडेतीन- चार तास सर्व पोराथोरांना मंत्रमुग्ध करून गेले. आज अचानक वेळ-राग-कलाकार हे त्रैराशिक मस्त जुळून गेले!
सव्वा- दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. दोघा दिग्गजांबरोबर पंडित विजय घाटे यांनीही स्वतःच्या बोटांची करामत दाखवली.
यमन या रागाला कल्याण असेही उल्लेखित केले जाते. हा राग रात्रीच्या प्रथम प्रहरी म्हणजे मावळतीच्या वेळी गायला जातो (साधारण ६-९ वाजता). शांत आणि भक्तिपूर्ण असा अंतर्मुख करणारा भाव हा राग नेहमीच निर्माण करतो. पंडित भातखंडे यांनी सांगितलेल्या दहा थाटांपैकी कल्याण या थाटातील हा राग आहे. यमन हा कल्याण थाटाचे सर्वात उत्तम प्रतिनिधित्व करणारा राग मानला जातो. कल्याण रागांची प्रमुख वैशिष्ट्ये या रागात दिसतात. हा संपूर्ण -संपूर्ण राग आहे म्हणजे आरोह आणि अवरोहात साती स्वर लागतात. वादी -संवादी गंधार आणि निषाद लागतात. ह्या रागात कुठलाही स्वर कोमल लागत नाही. मध्यम तीव्र लागतो. शुद्ध मध्यमाचा वैशिष्ट्यपूर्ण वापर (ग म ग रे ग रे सा/ ग म ग रे सा) झाल्यास त्याला यमन-कल्याण असे नाव दिले आहे. हा सर्वच संगीतकारांनी खूप वापरलेला आणि तरीही सदैव तजेलदार आणि ताजा वाटणारा राग आहे, हिंदी- मराठी चित्रपट, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व प्रकारच्या रचना यमन मध्ये बांधल्या आहेत.
अशीच एक अमर रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संत मीराबाई यांच्या भजनावर अत्यंत कल्पकतेने यमन मध्ये बांधली आहे आणि तिचे स्वरांकन केले आहे गानसरस्वती लतादीदी यांनी. ही अमर रचना माझ्या मनात हरिप्रसाद आणि शिवकुमार यांची जुगलबंदी ऐकतानाच कानात घुमत होती. ती ओळीने तीन वेळा ऐकली तेव्हा मन शांत झाले. स्वर्गसुख आणखी काय हवे? घरच्या आंब्यांचा या वर्षीचा शेवटचा रस आणि असे संगीत!
काय सुंदर शब्द आणि ईश्वराच्या चरणी समर्पित भाव आहे मीराबाईचा.. तिचे शब्द लतादीदींच्या आवाजातून माझ्या कानातून अंतर्मनाच्या सर्वात खोलातल्या कप्प्यात जाऊन बसले. अश्रू आपोआपच ओघळले, आता याचेही अप्रूप राहिले नाही आई-अरुणाला.
किणु संग खेलूं होली
किणु संग खेलूं होली, पिया तज गए हैं अकेली
माणिक मोती सब हम छोड़े, गल में पहनी सेली
भोजन भवन बलो नहीं लागे, पिया कारण भई रे अकेली,
मुझे दूरी क्यों मेलि, पिया तज गए हैं अकेली
किणु संग खेलूं होली…
अब तुम प्रीत अवरसो जोड़ी, हम से करी क्यों पहेली
बहु दिन बीते अजहू आ आये, लगा रही ताला बेली
कीनू दिलमा ये हेली, पिया तज गए हैं अकेली
किणु संग खेलूं होली…
श्याम बिना जीयड़ो मुरझावे, जैसे जल बिन बेली
मीरा को प्रभु दर्शन दीजो, मैं तो जनम जनम की चेली
दरश बिना खड़ी दोहेली, पिया तज गए हैं अकेली
किणु संग खेलूं होली…
पंडित हृदयनाथजींच्या रचना म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकेच सोपे काम, फक्त त्यांच्या दोन बहिणी आणि इतर मातब्बर गायक करू जाणे. फक्त गुणगुणारे किंवा कराओके “गायक” या मंडळींनी त्या नादातच पडू नये, सीतास्वयंवरात रावणासारखी फजिती होणे निश्चित समजावी.
तुकाराम महाराजांच्या सारखे आत्ता टेरेसवर विमान उतरले तर लगेच चित्रगुप्ताकडे जायची तयारी आहे माझी, फक्त एका अटीवर की त्या लोकी पण असेच संगीत ऐकायला मिळावे. ते आश्वासन मिळाल्यास मी एका पायावर तयार! आणि गंमत म्हणजे या प्रवासाला निघताना कसलीच तयारी, बांधाबांध करायची गरजच नाही. अगदी पायजमा, टूथब्रश सुद्धा नको!!
लोकहो स्वतःची काळजी घ्या. वूहान व्हायरस सकट सर्व चिनी उत्पादनांवर बहिष्कार घाला आणि जरूर लवकरच लस टोचून घ्या
38 replies on “एका संध्याकाळची कहाणी”
सुंदर वर्णन। आणि मस्त संगीत।
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
Indian classical music is indeed the medicine of mind….
LikeLiked by 1 person
Yes it is music and tonic for the soul
LikeLike
खूप सुंदर !.music has power to heal !
LikeLiked by 1 person
नक्कीच
LikeLike
सहज सुंदर भाषा आणि अभिव्यक्ती. मन प्रसन्न झाले
LikeLiked by 1 person
धन्यवाद मेधाताई
LikeLike
माझी अशीच अवस्था खळे साहेबांचे ‘अभंग तुक्याचे’ ऐकताना होते …भेटी लागी जीवा ला तर तंतोतंत तुमच्या टेरेस च्या विमानाचे फील येते 😊
LikeLiked by 1 person
खरे आहे, भेटी लागे जीSS वा वर जो आर्त सूर लावला आहे तो काळजाला जाऊन भिडतो
LikeLike
खूप छान लेख मन प्रसन्न करणारा
LikeLiked by 1 person
खूप खूप धन्यवाद
LikeLike
Doc hats off to u.. just amazing.. medicine, ज्ञानेश्वरी, संगीत (यमन कल्याण च इतकं सुंदर विश्लेषण), साहित्य, पुराण, … सगळंच कसं जमत तुम्हाला 👍😀.. खूप सुंदर अँड thanks for the Meera Bhajan 🙏
LikeLiked by 1 person
अहो आपल्याला जे आवडते त्याला वेळ नेहमीच मिळतो आणि त्यासाठी कष्ट कधीच करावे लागत नाहीत
LikeLike
किती सुंदर लिहिले आहे जाकीर हुसेन यांच्या चार अंगुळे वर चालणाऱ्या रथाची उपमा तर उत्कृष्टच सरतेशेवटी तुकारामांच विमान तर अप्रतिमच सुंदर हा शब्द सुद्धा थिटा पडेल असे हे वर्णन
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
वाह!! सर, नेहमीप्रमाणे अतिशय प्रवाही, नादमय, चित्रमय आणि भावमय लेखन असे तुमचे लेखन…..राग यमन थोडासा ऐकला…. अतिशय प्रसन्न…. मीराबाई चे भजन आणि लता मंगेशकर यांचा तसेच पंडित हृदयनाथ जी यांचे संगीत सारेच अप्रतिम आणि मनाला खूप खोल स्पर्शून जाणारे…..
खूप खूप मनापासून तुमचे आभार👌👌🌹🌹
LikeLiked by 1 person
धन्यवाद क्षमा
LikeLike
प्रिय आदरणीय सर जी🙏🙏
अतिशय अप्रतिम.. माझे कडे शब्द्््््च नाहीत 💫✨💓
LikeLiked by 1 person
धन्यवाद सचिन
LikeLike
फारच सुरेख संत मीराबाईंचे भजन, आपले सविस्तर आणि अलंकारिक भाषेतले लिखाण, त्यावर यमन राग, खूपच छान!! ज्ञानेश्वरी अध्याय वाचनात आणि अशा संगीतमय वातावरणात सगळे मळभ दूर होईल यात शंकाच नाही डॉक्टर !
धन्यवाद 🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद नीलिमा जी
LikeLike
सुंदर आहे सर, संगीतामुळे बऱ्याच लोकांना मागच्या दीड वर्षात परिस्थितीला हाथाळता आलंय हे नक्की, छानच मांडलत। आळंदी, ज्ञानेश्वरी, तुकाराम माझ्यासाठी विलक्षण जवळचे कारण माझी मुक्ता त्यांच्या स्वाधीन केलीय मी, त्यांची स्तुती वाचायला मनाला फार फार बरं वाटत।
आभार
LikeLiked by 1 person
True Sanjeev. Stay blessed and safe
LikeLike
आदरणीय सर,केवळ अप्रतिम!! वैद्यकीय व्यवसाय सांभाळत आणी दुसर्याच्या दुखी हृदयांची काळजी घेत संगित साहित्य विश्वात लिलया आपले स़चरण केवळ अद्भुत!! हा छंद आमच्या पर्यत पाठुन आम्हालाही आपल्या आनंदात समाविष्ट करीत असल्या बाबत आभार!!
LikeLiked by 1 person
Thanks Rohankar saheb for your kind words
LikeLike
Enjoyed this thoroughly.
Ok, confession time, I am woefully bad at reading the Devnagiri script so first tried Google Translate which I found inadequate for the task so I copy pasted the post into word and printed it out. It has taken nigh on half an hour, but a well worthwhile investment of my time.
Ah the power of music. . .
I do love Indian classical, what little I know largely courtesy of Mum. Aniruddha the relationship you describe between Raga Yaman and your mood here I have with western classical music. Beethoven’s 5th symphony – Fate or War depending on the interpretations/interpretators.
War is my preferred interpretation as it references the ultimate war between us, representing life and the music the “violence” that is death. The opening four note sequence of the symphony almost describing “Death” knocking at the door and yet as the music proceeds I end up with a sense of calm and peace, but simultaneously invigorated.
Thank you for provoking me to think again on music and its abilities!
LikeLiked by 1 person
Thanks a ton Asit for going the roundabout way to read the post. Thanks a bunch for the wonderful feedback as well
LikeLike
समृद्ध करणारा अनुभव …!
LikeLiked by 1 person
Thanks Sandeep.
LikeLike
वाह सर , समृद्ध करणारा अनुभव,अप्रतिम लेखन शैली आणि खूप सुंदर माहिती. कला,संगीत, संत साहित्य आणि वैयक्तिक छंद मनःशांतीसाठी किती मदत करतात हे फार सहज समजावून दिलेत यासाठी आभार आणि उत्तमोत्तम लेखनासाठी नेहमीच शुभेच्छा
LikeLiked by 1 person
Thanks Vikas. Yes indeed music and spirituality are essential for relief from the inevitable stress in the times we live in. Stay safe and stay healthy & happy
LikeLike
.Aprateem shabda ani titkech aprateem Sangeet.Man trupt Zale.
LikeLiked by 1 person
Thanks Anju.
LikeLike
I enjoyed your thoughts expression and revelation of inner ABC. You are a real gem of a person very lively but camophaged as a man of few words in the consulting room. I feel nice to watch the change in you. God bless you. I look forward to reading your reflections on life as it reveals to you.
LikeLiked by 1 person
Thank you Dr Pandit for the kind words. Yes indeed, the persona in the clinic is quite different from the real one, necessarily so. Cannot discuss all this with the patients and their family
LikeLike
Dr. खरच संगीतात खूप जादू आहे.आणी तुमच्या कडून खूप अप्रतीम माहिती मिळते.पण तुम्ही जी चित्रगुप्ताचे विमानाची बात केली तर dr.मग आमच्या सारख्या पेशंटच काय होणार
LikeLiked by 1 person
ते विमान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या साठी आले होते हो. मज पामराला ती पायरी गाठण्यासाठी काही जन्म अजून घ्यावे लागतील
LikeLike