आज सकाळी उठून व्यायाम करताना पाऊस पडू लागला. साहजिकच माझी बोटे स्मार्टफोनच्या यूट्यूब वर दरबारी तोडी कडे वळली. या रागाला मियाँ की तोडी असेही म्हटले जाते. तानसेन याने म्हणे या रागाची निर्मिती केली.
गंमतच आहे पहा, एका बाजूने आपले धर्मनिरपेक्ष वगैरे मायबाप सरकार सर्वोच्च न्यायालयात रामायण हे कपोलकल्पित काव्य आहे आणि राम नावाची कोणी व्यक्ती अस्तित्वात नव्हतीच असे शपथपत्र देताना अजिबात कचरत नाही , आणि अकबर नावाचा एक अत्यन्त स्त्रीलंपट, ऐय्याश आणि क्रूरकर्मा किती चांगला होता याबद्दल भाकडकथा आणि भूलथापा सत्तर वर्षे लोकांना परत परत सांगत राहते, जणू काही लोकांना खरा इतिहास जाणून घेता येणारच नाही. त्याचा मीना बाजार नावाचा घृणास्पद प्रकार जिथे स्त्रियांना विकले जाई, आणि त्याने हेमूला हरवून दिल्लीवर पुनश्च कब्जा करताना लाखो हिंदूचे शिरकाण करून मुंडक्यांचा रचलेला मनोरा सगळे जग या खोट्या गोष्टींनी भुलून जाऊन दुर्लक्षित करेल. अशा या माणसाला संगीताचे कितपत खरी जाण आणि प्रेम असू शकेल याबद्दल माझ्या मनात मोठे प्रश्नचिन्ह आहेच.
असो, तर तानसेन याने निर्मिती केलेला (थोडा वेळ दंतकथा खरी मानूया की) हा राग. हा नेहमी सकाळच्या वेळेत गायला व वाजवला जातो. साधारण सूर्योदयाच्या नंतर काही वेळाने पण ऊन तापायच्या आधी (८-१० वाजेपर्यंत) म्हणजे या रागाची वेळ. रात्रभर चाललेल्या मैफिलीत अगदी पहाटे ४-४३० वाजता सुद्धा मी सवाई गंधर्व समारोहात हा राग ऐकला आहे. (पोलिसांनी वेळ बदलण्याची सक्ती करण्याआधी सवाई संपूर्ण रात्रभर चाले. शेवटच्या रात्री म्हणजे रविवारी पहाटे भीमसेनजी समारोपाचे गायला बसत आणि आम्हां सर्व कानसेनांचे कान, मन आणि आत्म्याला तृप्त करून सोडत)
या सुश्राव्य रागातील एक ३० वर्षांपूर्वी आशा भोसले, राहुलदेव बर्मन, आणि गुलजार या त्रिकुटाने एक अविस्मरणीय आलबम बनवला होता: दिल पडोसी है! त्यात एक आशाताईंच्या कसलेल्या आवाजातील रचना आहे. दरबारी ( उर्फ मियाँकी) तोडी मध्ये पंचमची ही अप्रतीम रचना. रागातील गांभीर्य तसेच मिलनाची लागलेली हुरहूर मस्त उमटली आहे आशाताईंच्या अद्वितीय आवाजात.
भीनी भीनी भोर ऐकताना मला नेहमी रात्रभर वाट बघून ताटकळलेल्या विरहिणीचेच दर्शन होते. या रागाचे हे इतके आर्त स्वरूप थेट मनाला जाऊन भिडते.
कर्नाटक संगीत पद्धतीत याच रागाचे नाव शुभपंतूवरळी आहे, फक्त फरक एकच, तोडी मध्ये आरोहात पंचम लावत नाहीत, आणि कर्नाटकी पध्दतीत याच्या आरोह व अवरोहात दोन्हीत पंचम लावतात.
आताच भीमसेनजींचा उल्लेख केला, त्यांचा तोडी किती वेगळा वाटतो ते पहा. त्यांचा मल्हार धबधब्याच्या जोशात अंगावर कोसळतोच! भीमसेनजी यांचे गाणे ऐकले की रक्त सळसळलेच पाहिजे, अंगावर रोमांच उभे राहिलेच पाहिजेत, इतका जोश माझ्या छोट्याशा आयुष्यात मी कोणत्याही गायकाच्या आवाजात अनुभवला नाही.
हे स्वरभास्कर पूर्ण तेजाने तळपत आपल्याला त्यांच्या आवाजाच्या ताकदीने अगदी दिपवून टाकतात. त्यांची आणि स्वरमार्तंड पंडित जसराज जी या दोन महापुरुषांच्या आवाजाने माझ्या (आणि मागच्या पुढच्या दोन दोन पिढ्यांचे) सारख्या ऐकणारांचे भावविश्व संपन्न आणि परिपूर्ण करून टाकले. कधीही २४ तासांत दोघांपैकी कोणाचेही गाणे ऐकावे, तृप्ती येणारच.
गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांची शैली एकदम वेगळीच धुंदी आणि भावानुभव देणारी. हाच राग त्यांच्या आवाजात किती वेगळा वाटतो ते पहा:
किती भाग्यवान मी आणि माझी पिढी की स्वर्गसुख आणि स्वर्गानुभव मिळवण्यासाठी आम्हाला मरणाच्या वाटेने जावेच लागले नाही. या दिग्गजांच्या गाण्यात डुंबून घेतले की मिळणारा अमृतानुभव स्वर्गसुखापेक्षा कमी कसा लेखता येईल? समुद्रमंथन न करता आमच्या वाटेला हलाहल नव्हे, केवळ अमृत आले.
सध्या हिमेश रेशममिया , यो यो हनी सिंघ , बादशाह वगैरे गर्दभराज त्यांच्या रेकण्यातून हलाहल पसरवत आहेतच की! पण माझ्यासारख्या पामराची हिम्मत त्यांच्या वाटेला जाण्यासारखी नाहीच! त्यामुळे आमच्या अमृतसेवनात कधीही विघ्न आले नाही. तामस प्रकृतीच्या राक्षस गणांना बाकी ही सगळी मंडळी प्रिय! (गणपतीच्या वेळी पोपट उगाच नाचतात का?)
असो. अवांतर गप्पा खूप झाल्या. पंडितजी आणि किशोरीताई यांच्या अप्रतीम तोडी मध्ये हरवून जा, हरखून जा. चीन या नतद्रष्ट देशापासून लांबच रहा. त्यांच्या विषाणूने जगभर थैमान घातलेलेच आहे, त्यापासून स्वतः चे रक्षण करा, संधी मिळाली की या मानवजातीच्या द्रोह्यांच्या सर्वच गोष्टींवर संपूर्ण बहिष्कार टाका. नाहीतर दर ५ वर्षांनी माहेरचा आहेर ठरलेलाच…
12 replies on “तोडीस तोड”
अप्रतिम ! आपण भाग्यवान की या दिग्गज कलाकारांना live ऐकायचे भाग्य लाभले आणि आता पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येतो !
LikeLiked by 1 person
खरे आहे केदार, आणि पाहिजे तेव्हा आस्वाद घेता येतो
LikeLike
सगळंच अप्रतिम…. ऐकताना समाधी लागली….
या सगळ्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी तुम्हांला मिळाली हे तुमचं भाग्य….आणि सवाई गंधर्व महोत्सवात सुद्धा रात्रभर या कलाकारांना ऐकण्याची संधी तुम्हाला लाभली….फारच छान
उत्तम कलाकृती share केल्याबद्दल खूप आभार…. शास्त्रीय संगीत शिकत असल्यामुळे ऐकण्यात विशेष आनंद आणि रुची वाटली….
किशोरीताई ना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला एकदाच माझ्या गुरुंमुळे लाभले…..🙏🏻🙏🏻
LikeLiked by 1 person
किशोरीताई यांनी स्वतः ची वेगळीच शैली आयुष्यभर परिश्रम करून विकसित केली होती, त्यांचे गाणे खरोखरच एकमेवाद्वितीय आहे
LikeLike
पंचमच भोर भये पंछी असंच एक आवडतं आहे माझं
LikeLiked by 1 person
पंचम खूप गुणी संगीतकार होता, त्याची नवनवोन्मेषशाली प्रतिभा पाहून आजही थक्क व्हायला होते
LikeLike
संगीतात मला गती नाही. पण *अकबर आणि तानसेन* यांच्या साहचर्याबद्दल आता खरोखर आश्चर्य वाटतेय.
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
Too good, can’t decide whether Guljarji’s words or Panchamda’s composition with every animal background sounds and on top of it Ashaji’s aalapi . One of the best I heard . Thanks for sharing 🙏 . Actually I heard it at wrong time just before afternoon nap , but real music is beyond everything ( I mean time etc.) . Thanks once again.
LikeLiked by 1 person
Indeed, Ramesh. I believe time is crucial in the performance of the raag. The same raag at a different time doesn’t quite have the same impact.
LikeLike
डॉक्टर खूप सुंदर आहे हे सारेच 🙏
LikeLiked by 1 person
अगदी !!
LikeLike