Categories
Uncategorized

एक चिरंतन विरहगीत

आज सकाळी रेडिओवर या गाण्याची झलक ऐकायला मिळाली. कविवर्य वा. रा. कांत यांच्यावर एक कार्यक्रम होणार होता त्याची झलक होती. वसंतराव देशपांडे यांच्या सुरातून प्रगटलेले अप्रतिम काव्य, श्रीनिवास खळे यांची मस्त संगीत रचना. आज संध्याकाळी मस्त जेवण झाल्यावर आठवण झाली. खळेकाका इतक्या उच्च दर्जाचे संगीतकार की मज पामराने त्यांच्याबद्दल काय बोलावे?

या कवितेला गझलेसारखे जनसंमोहिनी सारख्या (अगदी अचूक नाव ठेवले आहे पहा, खरेच मोहात पाडणारा, अगदी संमोहीत करणारा हा हळुवार राग) रागात बांधले आहे. जनसंमोहिनी या रागाचे मूळ नाव होते “शिवकल्याण“. काही कारणाने हा राग काही वर्षे प्रचलित राहिला नव्हता. पंडित रवीशंकर जी यांनी मूळ राग कर्नाटक संगीतातून परत आणून प्रचलित केला. या रागात विरह, जुन्या आठवणीत गुंगणे, श्रद्धा हे भाव अप्रतिम दिसून येतात. सायंकाळी ६-९ हीच याची बरोबर वेळ.

राहिले ओठातल्या ओठांत वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का, ती खरी की स्वप्न माझे…

कापरे ते हात हाती बावरे डोळ्यात आसू ,
आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू ,
दोन थेंबाच्या क्षणाचे प्रीतीचे तकदीर माझे

गर्द हिरवे पाच पाणी रक्त कमळे कुंकुमाची,
खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची,
आठवे म्हटलेस ना तू हे हवेसे विश्व माझे

मी म्हणू कैसे फुला रे आज तू नाहीस येथे,
वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनि पात्र माझे ..

राहिले ओठातल्या ओठात शब्द माझे… राहिले….

वा. रा. कांत हे मराठवाड्यातील एक प्रसिद्ध कवी! मूळचे नांदेडचे. बऱ्याच आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे. वामन रामराव कांत यांना लौकिक अर्थाने शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. पण साहित्यिक म्हणून आणि कवी म्हणून त्यांचे कार्य खूप मोठे आहे. दहा काव्यसंग्रह प्रसिद्ध केले, खूप पुरस्कार आणि सन्मान मिळाले, पण या माणसाच्या काव्याने इतरांना खूप जास्ती प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला. स्वतः ते महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धी पासून दूरच राहिले. “बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात”, “त्या तरुतळी विसरले गीत”, “सखी शेजारीणी” ही सगळी त्यांच्याच लेखणीतून उतरलेली अत्यंत प्रसिद्ध गीते आहेत.

आजोबांच्या (त्यांनीच स्थापित केलेल्या) गादीवर सध्या विराजमान त्यांचा प्रतिभावंत नातू राहुल संगीतात खूप प्रयोग करत असतो. मला नक्की खात्री आहे की आजोबा इंद्राच्या दरबारातील सर्वांना मंत्रमुग्ध करून त्याचे हे गाणे ऐकतील आणि खूष होतील, त्याच्या पाठीवर थाप मारून “शाब्बास” असे जोरात म्हणतील!https://youtu.be/hkVRhw-vUMM

आज संध्याकाळी एव्हढेच. एखाद्या अप्रतिम रत्नाला पट्टीच्या जवाहिऱ्याने पैलू पाडावेत, त्याची पारख करून उत्तम कोंदणात बसवावे आणि एखाद्या रसिकाला तो दागिना न्याहाळण्यासाठी द्यावा असेच मला वाटते आहे.

मित्रहो आपली काळजी घ्या, चिनी लोकांच्या कपटाने संपूर्ण मानवजातीला गेल्या दीड वर्षांपासून हैराण केले आहे. आपण सर्वांनी जागरूक राहून याचा सामना केलाच पाहिजे. शेवटी त्यांचे निर्दालन केले पाहिजे, शुभरात्री…

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

14 replies on “एक चिरंतन विरहगीत”

वसंतराव देशपांडे यांची गायकी इतर कोणत्याही कलाकारापेक्षा वेगळ्याच घाटणीची होती

Like

खूप गोड गाणं… अप्रतिम काव्य….आणि वसंतराव देशपांडे जी आणि राहुल देशपांडे यांचं अतिशय तरल आणि हृदयस्पर्शी सादरीकरण…..सगळंच छान….
तुमचे खूप आभार अनिरुध्द सर….. आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या लेखणीतून खूप छान माहिती मिळाली…..
राहुल देशपांडे यांचे गाण्यातले निरनिराळे प्रयोग खरंच सुंदर👌👌💐💐

Liked by 1 person

कविवर्य वा रा कांतांचे शब्द, श्रीनिवास खळयांचे संगीत आणि वसंतरावांचे सूर …..त्रिवेणी संगम…… वाह
Rahul Deshpande is my personal favourite singer among his contemporaries. I had been following all his live programs on FB during last year’s lock down.

Thanks for the wonderful pick to share with us!

Liked by 1 person

२००० दशकाच्या काळात वसंतराव देशपांडे आणि भिमसेन जोशि ह्यांचे कार्यक्रम दूरदर्शन वर बघायला मिळायचे जुन्या आठवणी आठवल्या.
Thanks for sharing sir.

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s