दर शनिवारी-रविवारी निसर्गाच्या कुशीत राहून रविवारी शहरात परतायचे खरे तर माझ्या , अरुणाच्या आणि आईच्याही जीवावरच येते, पण शेवटी “पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा” हे अगदी खरे आहे. काल स्वच्छ सुंदर निसर्गाच्या सहवासात राहून मन शांत झाले होते. माझ्या सर्वात मोठ्या बहिणीच्या सान्निध्यात राहून काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. ती वयाने माझ्या धाकट्या मामाएव्हढी आहे, माझ्यापेक्षा १७ वर्षांनी मोठी! तिने मला अगदी काही महिन्यांचा असल्यापासून तिच्या अंगाखांद्यावर खेळवले आहे. आता काल तिने मला “पिल्या” असे संबोधले तेव्हा अरुणा खुदकन हसली, एखाद्या हिंस्र श्वापदाला “यू यू” करून बोलावते का कोणी? पण सुधाताईला तो बाल्यावस्थेतलाच मी आठवलो बहुतेक. आईला ही ऐकू आल्याने तीही सुखावली. कौले पडलेल्या तिच्या मुलाला असे कोणी म्हटल्यावर ती हसली आणि तिने सुधाताईला “माझ्या जन्माची बेष्ट ष्टोरी” खास मिरासदारी शैलीत ऐकवली. गंमत म्हणजे माझा जन्म झालेल्या कोल्हापूरच्या डॉ शांताबाई किर्लोस्कर यांच्याकडे माझ्या पेशन्टची पत्नी डॉ कलबाग या लग्नापूर्वी काम करत असत. खूप पोटभर गप्पा, मस्त जेवण, आणि मस्त संगीत! बाहेर ५ किलोमीटर चालून आल्यावर भरपूर पाऊस सुरू झाला, तो रात्रभर चालू राहिला होता. सकाळी परत मनसोक्त चाललो, बाया म्हणजे सुगरण पक्षांची वसाहत पाहून आणि त्यांची खटपट पाहून प्रेरणाच मिळाली. त्या बाभळीच्या झाडावर त्यांनी महिन्या- दीड महिन्यांपूर्वी बांधलेली सर्व घरटी दुष्ट माणसांनी काहीही कारण नसताना काढून टाकली (विकली ही असतील- पृथ्वीवर माणसाइतका दुष्ट प्राणी नक्कीच नाही, विनाकारण इतर पशु-पक्ष्यांना त्रास देण्यात व त्यांची हत्या करण्यात त्याला काय धन्यता वाटते माहीत नाही, इतर कोणत्याही प्राण्याकडून अशी वागणूक दिसत नाही).

घरी आलो, संध्याकाळी का कोणास ठाऊक अचानक एक अप्रतिम गाणे आठवले. उंबरठा या स्मिता पाटील यांच्या अजरामर चित्रपटात वसंत बापट यांच्या रचनेला सुरांचा साज चढवला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. बाळासाहेब यांच्या रचना कानसेनांना खूप सुखावतात, पण गायला तेव्हढ्याच क्लिष्ट असतात. हे शिवधनुष्य पेलायला तेवढ्या ताकदीचा कलाकार हवा. “मी, मी” म्हणणारे गायक ते आव्हान न पेलल्याने स्वतःचे हसे करून घेतात. लता, आशा या बाळासाहेबांच्या भगिनींना हे सहज जमते. ही एक अप्रतिम, खऱ्या अर्थाने अजरामर रचना, तिलक कामोद रागात बांधलेली. कितीही वेळा ऐकली तरी हिची गोडी अवीटच राहिली आहे! प्रत्येक वेळी तेव्हढीच तृप्ती! ईश्वराला कृतज्ञ होऊन वाहिलेली एक विनम्र शब्दांजली!
स्मिता पाटील यांच्या उज्ज्वल कारकिर्दीतले हे एक सोनेरी पान. डॉ जब्बार पटेल (बालरोगतज्ज्ञ असलेल्या दौंड येथे प्रॅक्टिस करत असलेल्या पण हाडाचे कलाकार असलेले हे व्यक्तिमत्त्व सर्वच मराठी रसिकांच्या परिचयाचे आहे) यांनी दिग्दर्शित या चित्रपटात सर्वच बाजू ताकदवान रथी-महारथींनी सांभाळल्या आहेत. सर्व गाणी बाळासाहेबांनी बांधली आहेत, पण पार्श्वसंगीत रवींद्र साठे यांचे. स्मिता पाटील बरोबर गिरीश कर्नाड हे मुख्य भूमिकेत आहेत. सोबत श्रीकांत मोघे आणि आशालता वाबगावकर हेही आहेत. शांता निसळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित हा चित्रपट. बघितला नसेल तर जरूर बघा. चारच गाणी, सर्वच उत्कृष्ट..
तिलक कामोद हा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी (म्हणजे मध्यरात्री पासून पहाटे ३ वाजेपर्यंत) गायला /वाजवला जाणारा हा खमाज थाटातील षाडव-संपूर्ण राग. जराशी चूक झाली तर एकदम देस रागात पोचण्याचा धोका.
तिलक कामोद मधली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची एक जुनी चित्रफीत मला तुमच्या बरोबर ऐकावीशी वाटते. https://youtu.be/Ssw26FGBUh4
भीमसेनजींच्या गाण्याबद्दल मज पामराने काय बोलावे. त्यांचे गाणे ऐकणे म्हणजे भर पावसात प्रपाताच्या खाली जाऊन उभे राहायचे आणि त्यांच्या स्वरौघात मनसोक्त न्हाऊन घ्यायचे! ते सुख , ती तृप्ती आणि ती ताकद फक्त भीमसेनजींकडे आहे! १९६८ मध्ये मी त्यांची मैफिल पहिल्यांदा ऐकली. तेव्हा गाण्याची काहीच जाण नव्हती (म्हणजे आता खूप आहे असे अजिबात नाही, पण ऐकून ऐकून माझा अगदी औरंगझेब राहिला नाही, एक कानसेन तरी तयार झाला आहे) पण जे काही माझ्या कानात गेले ते मला आवडले, चक्क पूर्ण जागून मध्यरात्री नंतर संपलेल्या मैफिलीतून उठून जाऊ नये असे बाबांच्या मताशी मी सहमत होतो- त्याकाळी दयानंद शाखेत जाऊन खूप वेळ मांडी घालून बसण्याची सवय होती, त्याचा फायदा झाला.
सरतेशेवटी पंडित रोणू मुजुमदार यांच्या मधाळ बांसुरीतून उमटलेले तिलक कामोद चे हे सूर ऐका…
आज एव्हढेच पुरे. लोकहो काळजी घ्या. गणेशोत्सव येतोय, आपण हिंदू सर्व समारंभ गेले दोन वर्षे अतिशय जबाबदारीने व साधेपणाने पाळतोय. अगदी सलग दोन वर्षे पंढरीच्या वारीलाही मुकलो पण बिलकुल हूँ का चू न करता आपली वैचारिक बैठक दाखवून दिली. सर्वधर्मसमभाव आहे म्हणे इथे, पण मायबाप सरकारने तो दाखवला का? उत्तर तुम्हांला माहीतच आहे. चिनी विषाणू चा धोका अजूनही पूर्णपणे टळला नाही, त्यामुळे आपण खबरदारी घ्यावी हे उत्तम. लस माझ्या सर्वच परिचितांनी घेतली आहे, बहुतेक सर्व रुग्णांनीही घेतली आहे, जरूर सर्वांनी लवकरच घ्यावी व विश्वातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा!
36 replies on “एका पावसाळी सायंकाळी…”
खूप सुंदर ! 👌👌👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद आनंद
LikeLike
खूपच छान
LikeLiked by 1 person
धन्यवाद अशोक
LikeLike
वर्णन ऐकताना वातावरणाशी समरस झालो व आनंद वाटला.
LikeLiked by 1 person
धन्यवाद उदय
LikeLike
खुपच छान …मी तुमचयातलया डॅा ना नेहमी भेटतो आज एका संवेदनशील माणसाला पण भेटतोय ..🙏🏻😊🌹👍👍
LikeLiked by 1 person
सरजी 👏❣️
खूप खूप सुंदर लिहिले आहे.
LikeLiked by 1 person
धन्यवाद सचिन
LikeLike
अजय साहेब डॉक्टरांनी अगदी अरसिक असू नये की नाही? सर्वच बाबतीत संवेदनशील असावे
LikeLike
वाह !! सर… तुमचे निसर्ग शब्दं चित्रण फारच अप्रतिम….खरे आहे ज्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते त्यांना आपण कितीही मोठे झालो तरी लहानच वाटतो वयाने….नेहमीच….आणि अश्या लोकांनी आपल्याला लहानपणीच्या गोंडस नावाने हाक मारली की आपण मनोमन सुखावतो…..
बाकी सगळेच फार सुंदर…..
गगन सदन तेजोमय…. अप्रतिम…..
भीमसेनजींचा आवाज आणि गायकी म्हणजे सुरांचा शब्दं मधुर जलप्रपात…..
आणि रोणू मुजुमदार यांची बासरी ऐकताना त्या सुरांमध्ये विरघळून गेल्यासारखेच वाटते…..
एकूणच अनुभव अप्रतिम…..
धन्यवाद अनिरुध्द सर….🙏🙏🌹🌹
LikeLiked by 1 person
खरे आहे क्षमा तू म्हणालीस ते, मनमोकळ्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
LikeLike
सुंदर,वाचताना आपण तिथेच आहें असे वाटते, छान शब्दाकन
LikeLiked by 1 person
धन्यवाद अंजली जी
LikeLike
खूपच सुंदर !
LikeLiked by 1 person
धन्यवाद करुणा जी
LikeLike
सर तुम्हाला सहज पण किती अवघड सुचत!!👌🙏🏽
सुंदर आत्मचरीत्राच एक पान वाचल्या सारख वाटल…!!
निसर्गाच्या कुशीतील आनंद द्वीगुणीत झाला👌
सुट्या संपल्यावर शाळा अजिबात आवडत नसे… तस काहींस वाटून गेल😅👍आपल्यातल लहान मूल जपावं ते अस👍
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ बोराळकर
LikeLike
सर…अतिशय अप्रतिम वर्णन… निसर्गाचे…लहानपणाचे आणि ह्र्दयस्पर्शी संगीताचे…छान वाटले..!!
LikeLiked by 1 person
धन्यवाद मॅडम
LikeLike
👌👌
LikeLiked by 1 person
Thanks Ajit
LikeLike
निसर्ग आणि संगीत अगदी हातात हात घालून चालले या लेखात निव्वळ अप्रतिम आणि गगन सदन उत्कृष्ट
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ डांगे
LikeLike
Beautiful. Nostalgia has deeper beauty. And simple..straight to heart language.
LikeLiked by 1 person
Thanks Sir. Your encouragement means a lot
LikeLike
मधुर लिखाण। सुमधूर संगीत।
LikeLiked by 1 person
Thanks Avi
LikeLike
Apratim
LikeLiked by 1 person
Thanks Megha
LikeLike
Dr ABC स्वत: आम्हा ज्युनियर डाॅ बऱ्याचवेळा “अरे बाळा” असं संबोधत असत. अनेकवेळा पेशंटच्या मॅनेजमेंट च्या वेळेस , अरे बाळा असं नाही तसं, अशा प्रकारे शिकवल्याने त्यांची भिती वाटली नाही व अनेक गोष्टी शिकतां आल्या. ☺️
LikeLiked by 1 person
Dr V R Pai used to always do this. Just can’t forget his shining face with such a wonderful smile, enormous energy and fantastic memory and bedside manners. Amazing man who always radiated joy and positive vibes.
LikeLike
खूपच छान , या वेळी एका वेगळ्या मूडमधे , खूप वेळा तू दर्दभरित गाण्यांबद्दल लिहितोस . काल सकाळी भूलेबिसरे गीत ऐकतांना तुझी आठवण आली होती . गाणे होते दिल गया तो गया दिलरूबा मिल गया . गायले होते शमशाद बेगम आणि सुमन कल्याणपूर , चित्रपट शमा आणि संगीत गुलाम हैदर , तुला माहित पण असेल . तुझ्या FM Gold program मधे गुलाम हैदर theme कशी वाटते .
LikeLiked by 1 person
Very nice. Absolutely doable. Great composer
LikeLike
Nicely written! You make my Aai’s life complete just by being that younger brother to her …. That’s so nice of you ❤️
It’s one thing to appreciate all good things in life – relationships, nature, art, music and so on….and it’s another thing to be able to express the appreciation so well. You have a unique sense of mastery over words.
Keep writing! We may not be posting our feelings here always, but we all love to read your blogs.
LikeLiked by 2 people
Thanks a ton, Sujata. Stay happy, healthy and safe
LikeLiked by 1 person