तारी मज आता रखुमाईच्या कांता l पंढरीच्या नाथा मायबापा ll१ll अनाथांचा नाथ ऐकियले कानी l सनकादिक मुनी बोलताती ll२ll त्यांचिया वचनाचा पाहुनी विश्वास l धरिली तुझी कास पांडुरंगा ll३ll नामयाचि लेकी लिंबाई म्हणे देवा l कृपाळू केशवा सांभाळावे ll४ll संत लिंबाई

प्रस्तुत अभंग संत नामदेव महाराजांची लेक संत लिंबाई यांचा असून पंढरीश परमात्म्याला आपला सांभाळ करण्याविषयी त्या करुणा भाकत आहेत. संत लिंबाई म्हणतात “हे रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा तू आम्हांला या भवसागरातून तारुन ने! तू अनाथांचा नाथ आहेस अशी तुझी ख्याती सनकादिक मुनींकडून मी ऐकलेली आहे. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवूनच मी तुझ्या आश्रयास आले आहे. शेवटी संत लिंबाई म्हणतात देवा तू कृपाळू आहेस.तूच आमचा सांभाळ करावा!”
—————————————–.
Il रामकृष्ण हरि ll
2 replies on “तारी मज आता”
खूप सुंदर🙏🙏
हा अभंग वाचून संत कान्होपात्रा यांचा ” नको देवराया अंत आता पाहू…..” या सुंदर अभंगाची आठवण झाली🙏🙏🌹🌹
LikeLiked by 1 person
अगदी खरंय
LikeLike