पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊं पैलथडी ॥२॥
अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ॥३॥
हें तों नाहीं सर्वकाळ । अमूप अमृताचे जळ ॥४॥
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥५॥
संत तुकाराम महाराज

प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराजांनी परमात्म्याची भक्ती करताना हरिभजनात तल्लीन झाल्यावर जो आनंद प्राप्त होतो तो व्यक्त केला आहे. आनंदाचा पूर, प्रेमाच्या लाटा अशा रुपकाच्या माध्यमातून आपला अनुभव सांगितला आहे.
महाराज म्हणतात परमात्म्याची निस्सीम भक्ती करत असताना हरिभजनामुळे मनात आनंदाचा मोठा पूर आला आहे. त्यामुळे परमात्म्याविषयीच्या प्रेमरुपी लाटा मनात सारख्या उसळत आहेत. कंबरेला विठ्ठल नामाची सांगड पक्की बांधून या भक्तीच्या डोहात आनंदरुपी पूरात पोहून पलीकडे असणाऱ्या परमात्मथडीस जाऊ. भवसागर पार करून आपण मोक्षरूपी तीरावर पोहोचू. तुम्ही बंधूजन माझे सवंगडीच आहात. तेव्हा तुम्ही सर्वांनी विठ्ठलनामाच्या सांगडीसह या आनंदाच्या पुरात उडी मारा. कारण हा हरिनाम रुपी (भक्तीरुपी) डोह आहे, त्यातील हे आनंदाचे अमृतरुपी पाणी (ओसंडून जाणारा आनंद) कायम स्वरुपी प्राप्त होणारे नाही. म्हणजे मनुष्य जन्माखेरीज दुसऱ्या जन्मात हा निखळ आनंद मिळणार नाही.
याचि जन्मी घडे देवाचे भजन आणिक हे ज्ञान नाही कोठे. आयुष्यभरच्या या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे हे फक्त मानवी योनीतच साध्य होऊ शकते. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात जन्मोजन्मांतरीच्या (इतर सर्व चौऱ्याऐशी लक्ष योनीत साठवलेल्या थोर पुण्याईमुळे या भक्तीमार्गाने आनंदाचा ओघ येथपर्यंत, मानवी जन्मापर्यंत, आला आहे, तो पुरेपूर उपभोगता आला पाहिजे म्हणजेच मोक्षप्राप्ति होऊ शकेल.
जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली! अशा या भक्तीरुपी डोहात आनंदाच्या पुरात आपणही उड्या घेऊन परमात्म्याला शरण जाऊ या.
ll रामकृष्ण हरि ll
16 replies on “तुका म्हणे”
!!जय हरी विठ्ठल!!
LikeLiked by 1 person
रामकृष्ण हरी
LikeLike
छान
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
सुरेखच 👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
सुंदर अभंग
LikeLiked by 1 person
अगदी खरे आहे
LikeLike
🙏🌹
LikeLiked by 1 person
Thanks Vivek
LikeLike
फारच सुरेख….👌👌
परमेश्वराशी एकरूप व्हावे….
त्याच्या नामी विरघळून जावे…..
आनंदाच्या डोही नहावे…..
होऊन चित्ती शुद्ध दर्पणी पहावे…..
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
LikeLiked by 1 person
अगदी खरे, असेच गाता गाता स्वरांप्रमाणे विरून जावे
LikeLike
खूप छान
LikeLiked by 1 person
Thanks Sachin
LikeLike
सुंदर अभंग..👌🏻
राम कृष्ण हरी..🙏🏻🙏🏻
LikeLiked by 1 person
अगदी खरे, धन्यवाद सुजित
LikeLike