Categories
Uncategorized

एका प्रवासाची सुरुवात…

गेले काही महिने आईचा वेळ जावा आणि माझी बौद्धिक व आध्यात्मिक प्रगल्भता वाढविण्यासाठी मी घरी रोज एखादा मराठी माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व आपल्यासाठी परमपूज्य असा ग्रंथ वाचतो आहे. श्री ज्ञानेश्वरी चे एकदा वाचन झाले, त्यानंतर दासबोध ही झाला. आज गाथेची सुरुवात केली.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची रसाळ अमृतवाणी. त्यात गाथेच्या सुरुवातीलाच पंढरीनाथ महाराजांचे मनोहारी वर्णन! वर्णन कसले, शब्दातून प्रत्यक्ष दर्शनच….

२६ जानेवारी २०११ रोजी देवाचे षोडशोपचार स्नान व काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी मला व माझ्या परिवाराला निमंत्रण मिळाले होते. देवानेच बोलावून घेतले असे म्हणूयात . अशा गोष्टीला एकच उत्तर असू शकते. त्याप्रमाणे आम्ही सर्व पंढरपुरी गेलो. पहाटे अडीच वाजता शुचिर्भूत होऊन देवळात पोचलो. बाजूच्या दरवाज्यातून थेट गाभाऱ्यात पोचलो. पुढील तास – दीड तास जे काय झाले त्याने माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले, आयुष्याचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले, जीवाचे सोने झाले. विठुराया च्या चरणी मस्तक ठेवताना त्याक्षणी एक निमिष भर मी सदेह वैकुंठाला पोचलो. विठुरायाशी एकरूप झालो.

सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनिया।।१।
तुळशीहार गळां, कासे पीतांबर। आवडे निरंतर हेंचि ध्यान।।२।।
मकर कुंडले तळपती श्रवणीं। कंठी कौस्तुभमणी विराजित।।३।।
तुका म्हणे माझे हेंची सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीने।।४।।

किती अप्रतिम वर्णन केले आहे निराकार, निर्गुण ईश्वराचे!

याच अभंगाचे स्वरार्पण खूप लोकांनी केलेले आहे, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते अगदी आजच्या गायकांमधील लोकप्रिय अशा मैथिली ठाकूर पर्यंत, सगळ्यांनी गाऊन झाले आहे. मैथिली आणि तिचे दोन्ही भाऊ (म्हणजे ऋषभ आणि अयाची) हे खरेच प्रचंड कष्ट करून, अतिसामान्य परिस्थितीतून बाहेर पडले आहेत. https://youtu.be/dj6fosmGKA0

त्यांचा साधेपणा पहा- काडीचा ही अहंकार चिकटला नाही. आता हे कुटुंब गरिबीतून बाहेर पडले आहे. पण कमालीचा साधेपणा. एक सुंदर कलाकृती निर्माण करण्यासाठी एक चांगली शब्दरचना, स्वररचना, उत्तम गाणे एव्हढे असले तर पुरे. वाद्यांचा चिवचिवाट नाही, गोंगाट नाही. निखळ आनंद! उच्चार ही स्पष्ट, अत्यंत लीनतेचा भाव देहबोली मध्ये दिसतो. लताबाईंच्या गाण्यापेक्षा वेगळेपणा दाखवणे पण आवडले मला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजलेला हा अभंग!

लताबाईंनी गायलेला हाच अभंग माझ्या मनात कायम कोरलेला आहेच. मैथिली चे गाणे सर्वांगसुंदर आहेच, पण मूळ गाण्या पेक्षा वेगळ्या प्रकारे सादरीकरण करण्यात तिचे धाडस वा तिची तयारी, आत्मविश्वास दिसून येतो.

मला लताबाईंच्या गाण्यात खळेकाका दिसतात. इतका एकमेवाद्वीतिय , खऱ्या अर्थाने दैवी प्रतिभेचा डोळे दिपवणारी आविष्कार! https://youtu.be/j3Hz5DhP4jw

मित्र हो, सुखी, सुरक्षित रहा. चिनी विषाणू पासून सावध रहा. विठ्ठल तुम्हां- आम्हां सर्वांनाच भवसागराच्या पैलतीरावर घेऊन जाईलच.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

40 replies on “एका प्रवासाची सुरुवात…”

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…..🙏🙏👌👌🌺🌺

अनेक श्री. संतांनी निर्माण केलेल्या साहित्य कृती वाचताना दरवेळी वेगवेगळ्या अर्थाची , आनंदाची आणि समाधानाची रसानिषपत्ती होते आणि मनोचेतना सुखावतात…..🙏🙏
दोन्हीं गाणी आणि त्यातील सुर अप्रतिम🙏🙏
आपण सर्व तो आनंद घेत आहात तसेच आपल्या सर्वांना पंढरपुरी विठुराया आणि रखुमाईंचे प्रत्यक्ष गाभाऱ्यात दर्शन आणि षोडशोपचार स्नान व आरतीला उपस्थित राहता आले हे आपले सर्वांचे भाग्य👌👌🌺🌺🙏🙏
श्री. रामकृष्ण हरी

Liked by 1 person

खरे आहे, परत तीच ओळ वाचली तरी नव्याने अनुभूती होते, पुनः प्रत्ययाचा आनंद अवर्णनीयच आहे, या समाधानाला मोलच नाही

Like

अनमोल आठवण व त्याचे अप्रतिम विवेचन. लता दीदी चे गोड आवाजातले अभंग सकाळी सकाळी ऐकून एक प्रसन्न वातावरण तयार झाल्याची अनुभती होते. अप्रतिम शब्दांकन. 🙏

Liked by 1 person

अगदी विठ्ठलमय केलेत आपण. स्वर, शब्द आणि श्रद्धा एकत्र आल्यानंतर ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय ह्याचा साक्षात अनुभव.

Liked by 1 person

आईसाठी आपलेपणाने आणि कर्तव्यभावनेने सुरू केलेला प्रवास नक्कीच परमोच्च आनंद देतो जसे तुझे झाले , तो प्रवास न राहता आनंदयात्रा बनते .🙏

Liked by 1 person

अप्रतिम ! तुमचे हे अनुभव नेहमीच आम्हाला समृध्द करतात. हा अभंग ऐकल्याक्षणी विठुरायाचे ते अवर्णनीय असे सुंदर रूप डोळ्या पुढे उभे राहते 🙏

Liked by 1 person

खरचं रोमांच उभे राहिले विठुरायासमोरचे दादा तुझे वर्णन वाचून…. 🙏🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s