Categories
Uncategorized

तुका म्हणे……..

जय हरी विठ्ठल

मान अपमान गोवे!
अवघे गुंडूनी ठेवावे!!

हेंचि देवाचें दर्शन!
सदा राहे समाधान!!

शांतीची वसती!
तेथें खुंटे काळगती!!

आली ऊर्मी साहे!
तुका म्हणे थोडें आहे!!

विठ्ठल विठ्ठल

मान आणि अपमान हा सर्व विचारच पूर्णपणे गुंडाळून ठेवावा म्हणजेच त्या निरर्थक भावनांचा पूर्णपणे, कायमचा त्याग करावा.

ज्या कोणत्या गोष्टीमुळे आपले अंतःकरण सदैव समाधानाने भरलेले राहते, तेथेच देवाचे दर्शन होते. तिचा पाठपुरावा नित्यनेमाने करावा.

अंतःकरणामध्ये शांती पसरली, की कालचक्र आणि संसारात होणारा त्रास दोन्ही आपोआप थांबून जातात, आणि क्लेशदायक राहात नाहीत.

तुकाराम महाराज म्हणतात, चित्तामध्ये निर्माण झालेली काम क्रोधाची उर्मी सहन करणे आणि त्यावर विजय मिळवणं सर्वात आवश्यक आहे. केवळ त्यामुळेच ईश्वराचे दर्शन होऊ शकते. ही स्थितप्रज्ञ अवस्था मिळविण्यासाठी जे जे लागेल ते करावे.

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

10 replies on “तुका म्हणे……..”

विठ्ठलाचे छायाचित्रातून खूप सुंदर दर्शन👌👌🙏🙏
स्थितप्रज्ञ राहण्याची तारेवरची कसरत जमण अत्यंत अवघड …..पण एकदा जमलं की मग शांत स्वस्थ आणि आनंदी चित्ताची गुरूकिल्ली सापडते आणि मग प्रत्येक क्षणात आनंद आणि ईश्वर सापडतो….

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s