गेल्या आठवड्यात हे गाणे अरुणाबरोबर गाडीत जाताना ऐकले.
मूळचे हे पद मा. दिनानाथांनी कित्येक वर्षांपूर्वी गायले होते. त्यांच्या आवाजाचा पोत निराळा होता आणि गायन शैलीही इतर सर्व गायकांपेक्षा वेगळीच होती. आवाजात विलक्षण ताकद आणि फिरत होती. क्षणार्धात दोन-तीन सप्तकातून पटकन अगदी लीलया फिरून यायचा त्यांचा आवाज. त्यांना साथ करायची म्हणजे ऑर्गन किंवा हार्मोनियम वादकाची परीक्षाच! https://youtu.be/QnfBk0ZPYD8
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले “सन्यस्त खड्ग ” या नाटकातील पद. याची संगीतरचना केली रामकृष्ण वझेबुवांनी. भैरवी रागातील हे पद:
सुकतातची जगि या।
जरी कीं। फुले गळत पाकळी पाकळी।
उमलती ना त्याही कलिका। ज्या।।
परंतु सुंदर कळ्या पाकळ्या।
फुलती ही जगीं या।
विसर ना हे वैतागीं। तुझीया।
एवढ्याच शब्दांचे पद, पण मा. दीनानाथ काय गायचे!! आता फक्त उरलेल्या तबकड्यातून त्याची कल्पना येते!
आशाताईंनी त्यांचे हे पद गायले होते आणि त्याचा वापर “दूधभात” नावाच्या चित्रपटात ५० च्या दशकात झाला होता. हा चित्रपट रामभाऊ गबाले यांनी दिग्दर्शित केला होता बहुतेक. मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटते की दिनानाथांच्या गायनशैलीची नक्कल कोणी करावी तर ती लतादीदी नव्हे तर आशाताईंनीच! इतर कोणीही तो प्रयत्न सुद्धा करू नये! हमखास तोंडघशी पडणार! https://youtu.be/0ya4aHAiwbs
वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात हेच पद ऐका: भैरवी म्हटली आहे, आत्म्याला हुरहूर लावणारे गाणे आहे वसंतरावांचे! हे सुद्धा इतर गायकांपेक्षा किती वेगळे! त्यांचे गाणे म्हणजे कंठातून उमटलेले वादळच!! त्यांच्या आवाजाची जादू ही वेगळीच होती! https://youtu.be/9XpkmZ2-LEc
आज दिल्ली विमानतळावर पुण्याच्या फ्लाईट ला उशीर झाल्याने हे गाणे आठवले. आशा खाडिलकर यांच्या आवाजातले हे पद सुद्धा प्रसिध्द आहे.
या दिग्गजांनी गायलेलं एकच पद ऐका, तोपर्यंत घरी पोचतोच!
मित्रहो, काळजी घ्या, उन्हाळ्यात द्रवपदार्थ जास्त सेवन करा म्हणजे उष्माघात होणार नाही!
8 replies on “नव्याने उजळणी एका कालातीत, अमर रचनेची!”
एकच गाणं पण प्रत्येकाच्या आवाजात वेगळे वाटतं.
७८आर पी एम् रेकाॅर्डवर प्रथम ऐकलं होतं
अप्रतिम सिलेक्शन
LikeLiked by 1 person
खरे आहे, धन्यवाद
LikeLike
तिन्ही एका पाठोपाठ ऐकायला फार च भारी वाटले..
तिघांची आपापली उत्तम च शैली.. आशा भोसले यांनी गायली, ती, मला जास्त भावते.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
आशा खाडीलकर , या वसंतराव यांच्या कडे शिकल्या, त्यांनी गायलंय हेच पद, तेही सुंदर आहे 🙏🏻
धन्यवाद..
LikeLiked by 1 person
खरे आहे, प्रत्येकाचे गाणे वेगळे आणि म्हणूनच मनाला भावते
LikeLike
The Devine experience
LikeLiked by 1 person
Thanks Anju
LikeLike
वाह 👌👌
किती छोटेसे पण अप्रतिम काव्य👌👌 स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार वंदन….
मास्टर दीनानाथ मंगेशकर, आशा भोसले जी, आणि वसंतराव देशपांडे….या प्रत्येकाच्या आवाजाचा पोत किती निरनिराळा आहे..प्रत्येकाचे सादरीकरण पण वेगवेगळे….पण ऐकताना प्रत्येकाचीच अनुभूती किती सुंदर आहे..👌👌👌👌
सगळ्यांनाच त्रिवार वंदन….यांच्यातील कलेचा काहीं अंश जरी वेचता आणि आत्मसात करता आला तरी मी स्वतः ला खरंच खूप भाग्यवान समजेन..🙏🏻🙏🏻😊😊
.
LikeLiked by 1 person
Very true. Ashatai Khadilkar’s rendition is totally different from the three
LikeLike