Categories
Devotional melodies Introspective melodies Serenity Spiritual music

रावणाच्या अहंकाराचे दमन

आज सायंकाळी परत आल्यावर गाथेचं वाचन झाले. थोडा वेळ शांत बसलो होतो तेव्हा मला एकदम या स्तोत्राची आठवण झाली. पंडित स्वरमार्तंड जसराजजी यांनी त्यांच्या दैवी स्वरांत जेव्हढे संस्कृत श्लोक आणि स्तोत्रे म्हटली आहेत तेव्हढी कदाचित दुसऱ्या कोणीही म्हटली नसावीत. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी त्यांनी शिवमहिम्न नावाची एक CD प्रकाशित केली होती.  हे स्तोत्र या CD मध्ये आहे…https://youtu.be/5eLbyBVAYsk

या स्तोत्रामागची (पुराणातील) कहाणी फारच रोचक आहे. ही कथा रामायणातील उत्तरकांडात आहे. रावणाने त्याच्या सावत्र भावाची (कुबेराची) वैभवसंपन्न अलकानगरी लुटली. यानन्तर तो कुबेराकडून लुटलेले पुष्पक विमान घेऊन लंकेला चालला होता. तेव्हा त्याला एक सुंदर ठिकाण दिसले पण त्यावरून पुष्पक जाईना. तो जमिनीवर उतरला आणि त्याला समोर वृषभराज नंदी भेटला. (नंदी चा उल्लेख नंदीश किंवा नंदिकेश्वर असाही केला जातो) . त्याने नंदीला पुष्पक या जागेवरून उडू का शकत नाही असे विचारले. नंदीने रावणाला सांगितले की कैलास पर्वतावर शिवपार्वती रतिक्रीडेत रममाण आहेत त्यामुळे कोणीही त्यांना विचलित करू शकत नाही. रावण अहंकाराने मदमस्त झाला होता. त्याने नंदी आणि शिवाची थट्टा केली. चिडलेल्या नंदीने रावणाला शाप दिला की माकडे त्याला युद्धात हरवतील व लंकेचा नायनाट करतील. त्याचा शाप ऐकून रावणाला राग आला आणि त्याने कैलास पर्वत समूळ उपटण्याचे ठरवले. सर्व शक्तीनिशी आपले वीस बाहूंचे बळ एकवटून त्याने कैलास पर्वत हलवणे सुरू केले. पर्वत हलायला लागल्यावर पार्वतीमाता घाबरून शिवाला बिलगली. सर्वज्ञानी आदीयोगी शिवाला रावण याच्या मुळाशी आहे हे कळले. त्याने विशाल रूप धारण केले आणि फक्त एका पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वताखाली रावणाला चिरडले. रावणाला थोडेही हलता येईना. रावणाचे दुःख पाहून त्याला त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला, त्याप्रमाणे तो शिवभक्तीची कवने गाऊ लागला. हे त्याने एक सहस्त्र वर्षे केले! शेवटी भोळा सदाशिव शांत झाला, त्याने रावणाला क्षमा केली आणि त्याला एक अजेय तलवार “चंद्रहास” दिली. रडल्यामुळे लंकेशाला “रावण” नाव पडले (रडणारा)- रावणाने म्हटलेले श्लोक गोळा केल्यावर त्यांना एकत्रित नाव “शिवतांडव स्तोत्र” असे पडले.

हे स्तोत्र कित्येक दिग्गजांनी गायले आहे, पण मला व्यक्तिशः पंडित जसराजजी यांच्या आवाजातील सर्वात जास्त आवडते.

रावण आपल्याला नेहमी दाखविला जातो तसा राक्षसी वृत्तीचा नीच नव्हता. अतिशय विद्वान, दशग्रंथी असा रावण वीणावादनात पारंगत होता तसेच सर्व शास्त्र, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद आणि राज्यकारभारात प्रवीण होता, त्यामुळे त्याच्या अधिपत्याखाली लंकेची खूप भरभराट झाली होती. त्याने अनेक ग्रंथांची निर्मिती केली तसेच शिवतांडव स्तोत्रही लिहिले आहे. या स्तोत्रात शिवाचे रौद्र रूप उत्तम दाखवले आहे. काव्य अतिशय सुंदर अनुप्रासालंकारांनी सजले आहे. विशेषतः डमरूचा धुंद करणारा नाद, गळ्यात सर्पमाळा व रूंडमाळा, कपाळावर धगधगणारे अग्निकुंड अशा गोष्टींचे उत्तम व मोहक वर्णन आहे.

शिव ताण्डव स्तोत्र 

जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ।
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥१॥

जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरीविराजमानमूर्धनि ।
धगद्धगद्धगज्जलल्ललाटपट्टपावके
किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥२॥

धराधरेन्द्रनन्दिनीविलासबन्धुबन्धुर
स्फुरद्दिगन्तसन्ततिप्रमोदमानमानसे ।
कृपाकटाक्षधोरणीनिरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥३॥

जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा
कदम्बकुङ्कुमद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखे ।
मदान्धसिन्धुरस्फुरत्त्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदमद्‍भुतं बिभर्तु भूतभर्तरि ॥४॥

सहस्रलोचनप्रभृत्यशेषलेखशेखर
प्रसूनधूलिधोरणी विधूसराङ्घ्रिपीठभूः |
भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक
श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ||५||

ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभा
निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकम् |
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसम्पदेशिरोजटालमस्तु नः ||६||

करालभालपट्टिकाधगद्‍धगद्‍धगज्ज्वलद्_
धनञ्जयाहुतीकृतप्रचण्डपञ्चसायके ।
धराधरेन्द्रनन्दिनीकुचाग्रचित्रपत्रक
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने रतिर्मम ॥७॥

नवीनमेघमण्डली निरुद्‍धदुर्धरस्फुरत्
कुहूनिशीथिनीतमः प्रबन्धबद्धकन्धरः ।
निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुरः
कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्धुरंधरः ॥८॥

प्रफुल्लनीलपङ्कजप्रपञ्चकालिमप्रभा_
वलम्बिकण्ठकन्दलीरुचिप्रबद्धकन्धरम् ।
स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे ॥९॥

अखर्वसर्वमङ्गलाकलाकदम्बमञ्जरी_
रसप्रवाहमाधुरीविजृम्भणामधुव्रतम् ।
स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं
गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे ॥१०॥

जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्‍भुजङ्गमश्वसद्_
विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाट् ।
धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल_
ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिवः ॥११॥

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्_
गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।
तृणारविन्दचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यहम् ॥१२॥

कदा निलिम्पनिर्झरीनिकुञ्जकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् ।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मन्त्रमुच्चरन्कदा सुखी भवाम्यहम् ॥१३॥

इदम् हि नित्यमेवमुक्तमुत्तमोत्तमं स्तवं
पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धिमेतिसंततम् ।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् ॥१४॥ 

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं

यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१५॥

॥ इति शिव ताण्डव स्तोत्रं संपूर्णम्‌॥

या स्तोत्राचा मला उमगलेला अर्थ मी मराठीत वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. माझ्याकडून प्रमाद किंवा चूक झाली असल्यास जरूर दाखवून द्यावी, मला माझे अज्ञान दूर करण्यासाठी मदतच होईल.

जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले
गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकाम् ।
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ॥१॥

जटांच्या जंजाळामधून वाहणाऱ्या पाण्याने (गंगा नदीच्या प्रवाहाने) ज्याचा कंठ पुनीत झाला आहे,
आणि त्याच्या गळ्यात नागाची जाड, लांबलचक माळच जणू लोम्बते आहे,
आणि डमरू मधून डम डम डम असा ध्वनी काढतो आहे,
ज्या शिवशंकराने भयंकर तांडव केले आहे, तो आपल्या सर्वांना सुख समृद्धी देवो.

जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिम्पनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरीविराजमानमूर्धनि ।
धगद्धगद्धगज्जलल्ललाटपट्टपावके
किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥२॥

असा शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या डोक्यावरच्या जटांमधून गंगा नदीच्या खळखळून लाटा वाहतात आणि  सुशोभित करतात,
ज्याच्या कपाळावर तेजस्वी अग्नी नेहमी प्रज्वलित आहे,
आणि ज्याने त्याच्या डोक्यावर चंद्रकोर एका अलंकाराप्रमाणे धारण केली आहे.

धराधरेन्द्रनन्दिनीविलासबन्धुबन्धुर
स्फुरद्दिगन्तसन्ततिप्रमोदमानमानसे ।
कृपाकटाक्षधोरणीनिरुद्धदुर्धरापदि
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि ॥३॥

पर्वतराजाची कन्या पार्वती ज्याची अर्धांगिनी आहे, जिच्या नेत्रपल्लवी ने मनाला आनंद मिळणाऱ्या, ज्याच्या कृपाळू दृष्टिक्षेपाने संकटे दूर राहतात, जो कधी कधी आकाशच वस्त्राप्रमाणे धारण करतो, अशा शंकराच्या उपासनेत माझे मन रमू दे!

जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणिप्रभा
कदम्बकुङ्कुमद्रवप्रलिप्तदिग्वधूमुखे ।
मदान्धसिन्धुरस्फुरत्त्वगुत्तरीयमेदुरे
मनो विनोदमद्‍भुतं बिभर्तु भूतभर्तरि ॥४॥

ज्याच्या जटांमध्ये वेटोळे घालून बसलेल्या मातकट रंगाच्या नागाच्या फड्यावरच्या मण्याच्या तेजस्वी प्रभेत, जो सर्व दिशांत कदंब आणि कुंकवाचा लाल रंग पसरवतो,   जो विशाल मदमस्त हत्तीच्या कातडीपासून बनवलेले वस्त्र घालतो, अशा भगवान शिवशंकरामध्ये मला अद्भुत सुख मिळो.

सहस्रलोचनप्रभृत्यशेषलेखशेखर
प्रसूनधूलिधोरणी विधूसराङ्घ्रिपीठभूः |
भुजङ्गराजमालया निबद्धजाटजूटक
श्रियै चिराय जायतां चकोरबन्धुशेखरः ||५||

सहस्त्र डोळे असलेल्या इंद्र आणि इतर देवांच्या मुकुटातल्या फुलांच्या परागकणांनी ज्याची वाट धुळकट झाली आहे, ज्याने केसांच्या जटा ज्याने भुजंगराजानेच बांधल्या आहेत, ज्याने चकोर पक्षाच्या मित्राला (चंद्राला) मुकुट म्हणून धारण केले आहे, तो  शंकर आपल्याला अखंड सुख समृद्धी देवो!

ललाटचत्वरज्वलद्धनञ्जयस्फुलिङ्गभा
निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकम् |
सुधामयूखलेखया विराजमानशेखरं
महाकपालिसम्पदेशिरोजटालमस्तु नः ||६||


ज्याने कामदेवाला आपल्या कपाळावर सतत जळणाऱ्या अग्नीच्या ठिणगीने भस्म केले, ज्याला देवलोकीचा इंद्र वंदन करतो,
ज्याच्या डोक्यावरच्या चंद्रातून अमृताचे किरण सतत स्रवतात, आणि हातात मोठं भिक्षापात्र व गळ्यात रुंडमाळ घातलेला शंकर आम्हाला लाभो

करालभालपट्टिकाधगद्‍धगद्‍धगज्ज्वलद्_
धनञ्जयाहुतीकृतप्रचण्डपञ्चसायके ।
धराधरेन्द्रनन्दिनीकुचाग्रचित्रपत्रक
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचने रतिर्मम ॥७॥

ज्याच्या भव्य कपाळावर धगधगणाऱ्या  अग्नीला कामदेवाला (ज्याचे पाच बाण शास्त्र आहेत) अर्पण केले,
तो एकमेव कलाकार आहे जो पर्वतराजाची कन्या पार्वतीच्या स्तनाच्या टोकावर सजावट
काढण्यात निपुण आहे, अशा त्रिनेत्र शंकराच्या ठायी माझे चित्त एकवटो!

नवीनमेघमण्डली निरुद्‍धदुर्धरस्फुरत्
कुहूनिशीथिनीतमः प्रबन्धबद्धकन्धरः ।
निलिम्पनिर्झरीधरस्तनोतु कृत्तिसिन्धुरः
कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्धुरंधरः ॥८॥

ज्याचा कंठ ढगांच्या माळांनी आच्छादित अमावास्येच्या रात्रीप्रमाणे गडद आहे,ज्याने देवलोकीची नदी गंगा आपल्या शिरावर धारण केली आहे, जो हत्तीचे कातडे पांघरतो, जो सर्व कलांचे केंद्रस्थान आहे,
जो सर्व जगाचा भार वाहतो, असा शंकर आम्हाला चिरंतन सुख देवो

प्रफुल्लनीलपङ्कजप्रपञ्चकालिमप्रभा_
वलम्बिकण्ठकन्दलीरुचिप्रबद्धकन्धरम् ।
स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं
गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे ॥९॥

पूर्ण उमलेल्या निळ्या कमळांच्या सारख्या काळ्या रंगाची ग्रीवा कानशिलापर्यंत लटकत असलेली सुंदर दिसते, ज्याने मन्मथाचा वध केला आहे, ज्याने त्रिपुर नष्ट केले आहे.
ज्याने जगाची सर्व बंधने नष्ट केली आहेत, ज्याने यज्ञाचा नाश केला आहे,
ज्याने अंधक राक्षसाचा वध केला आहे, ज्याने हत्तींचा नाश केला आहे.
ज्याने मृत्युच्या देवाला, यमाला पराजित केले आहे, अशा शंकराची मी पूजा करतो.

अखर्वसर्वमङ्गलाकलाकदम्बमञ्जरी_
रसप्रवाहमाधुरीविजृम्भणामधुव्रतम् ।
स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं
गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे ॥१०॥

मी अशा भगवान शिवाची प्रार्थना करतो, ज्याच्याभोवती पवित्र कदंब फुलांच्या सुंदर गुच्छातून येणाऱ्या मधाच्या मधुर सुगंधामुळे मधमाश्या फिरत आहेत.
ज्याने मन्मथाचा वध केला आहे, ज्याने त्रिपुर नष्ट केले आहे,
ज्याने जगाची सर्व बंधने नष्ट केली आहेत, ज्याने यज्ञाचा नाश केला आहे.
ज्याने अंधक राक्षसाचा वध केला आहे, ज्याने हत्तींचा नाश केला आहे.
ज्याने मृत्युच्या देवाला, यमाला पराजित केले आहे.

जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्‍भुजङ्गमश्वसद्_
विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाट् ।
धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल_
ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डवः शिवः ॥११॥


ज्याच्या भव्य कपाळावरचा अग्नी प्रचंड वेगाने फिरणाऱ्या नागाच्या श्वासोच्छवासामुळे पसरतो आहे, तसेच मृदंगाच्या धिमिद धिमिद अशा आवाजाच्या वाढत्या मंगल आवाजात हळूहळू वाढत जाणाऱ्या उग्रतेने तांडव करणारा शिव सदैव विजयी होवो.

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्_
गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः ।
तृणारविन्दचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः
समप्रवृत्तिकः कदा सदाशिवं भजाम्यहम् ॥१२॥

जो सर्व प्रकारची आसने आणि शय्या, सर्पमाळा किंवा मोत्यांची माळा, श्रेष्ठ रत्न किंवा मातीचे ढेकूळ असो, मित्र किंवा शत्रू, गवताचे पात्यासारखे किंवा कमळासारखे डोळे असो, पृथ्वीचा राजा असो की सामान्य प्रजा सर्वांप्रती समदृष्टि आहे, अशा भगवान शंकराची पूजा मी कधी करू शकेन?

कदा निलिम्पनिर्झरीनिकुञ्जकोटरे वसन्
विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् ।
विमुक्तलोललोचनो ललामभाललग्नकः
शिवेति मन्त्रमुच्चरन्कदा सुखी भवाम्यहम् ॥१३॥

पवित्र गंगा नदीच्या जवळ झोपडीत राहून,
माझे हात नेहमीच शिरावर जोडलेले ठेवून,
माझ्या दूषित विचारांना धुवून, स्त्रीच्या मोहक दृष्टीपासून मुक्त होऊन,
शिवाच्या कपाळाच्या तेजस्वी नेत्राच्या बंधनात असलेला मी
शिवाचा मंत्र उच्चारून मी सुखी कधी होऊ शकेन?

इदम् हि नित्यमेवमुक्तमुत्तमोत्तमं स्तवं
पठन्स्मरन्ब्रुवन्नरो विशुद्धिमेतिसंततम् ।
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं
विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् ॥१४॥ 

जो या स्तोत्राचे पठण करतो, स्मरण करतो किंवा श्रवण करतो,
तो सदैव शुद्ध होतो आणि महान गुरू शिवाची भक्ती प्राप्त करतो.
या भक्तीसाठी दुसरा कोणता मार्ग किंवा उपाय नाही.
फक्त शिवाचे चिंतनच जीवाला मोक्ष मिळवून देतो.

पूजाऽवसानसमये दशवक्रत्रगीतं

यः शम्भूपूजनमिदं पठति प्रदोषे ।

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्ष्मी सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॥१५॥

॥ इति शिव ताण्डव स्तोत्रं संपूर्णम्‌॥

जो हे शंकराचे रावणकृत गीत रोज संध्याकाळी पूजेच्या वेळी पठण करतो त्याला महादेव नेहमी रथ, गजेंद्र (उत्तम हत्ती), घोडे, यांच्याबरोबर सुंदर, शाश्वत लक्ष्मी (टिकणारी संपत्ती) दान करतो.

वरील सर्व श्लोक जास्त प्रचलित असलेल्या शिवतांडव स्तोत्रात नेहमी असतात, या व्यतिरिक्त दोन श्लोक काही वेळा या स्तोत्रात म्हटले जातात ते खाली उद्धृत केले आहेत. ते पंडित जसराज यांनी गायलेल्या स्तोत्रात नाहीत. त्यामुळे मीही ते वगळले आहेत.

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-

निगुम्फनिर्भक्षरन्म धूष्णिकामनोहरः ।

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहनिशं

परिश्रय परं पदं तदंगजत्विषां चयः ॥॥

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी

महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना ।

विमुक्त वाम लोचनो विवाहकालिकध्वनिः

शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌ ॥॥

हे माझे एक खूप आवडते स्तोत्र आहे, रावणाच्या मुखातून प्रकटलेले असल्याने त्याचे विशेष महत्त्व!

तुम्हांला कसे वाटले जरूर कळवावे. शुभरात्री

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

33 replies on “रावणाच्या अहंकाराचे दमन”

सर जी आज खूप आनंद झाला.. आत्मस्तुतीचा दोष पत्करून व्यक्त करतो..मी वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी पाच सुक्ते,रुद्र, आणि महीम्नची संथा गुरुवर्य गानूंच्यांकडून घेतली… आणि मी न चुकता रोज नित्त्यपुजेवेळी म्हणतो..देवाचे अस्तित्व आहे का?याचे उत्तर निश्चित रोज मिळते.शेवटी आत्मिक समाधान महत्वाचे…. शिवतांडव मुखोद्गत करण्याची मनीषा आहे… प्रयत्न करतो…… धन्यवाद..

Liked by 2 people

ज्याची जशी दृष्टी आणि बघण्याची कुवत असेल त्याप्रमाणे त्याला देवाच्या अस्तित्वाची प्रचिती येईल.

Like

Very good information, not aware abt it, specially d shiv stotra, great job. I really wonder how do u carved out time from ur schedule as a heart specialist, when u get time to read n then such impressive writing, simply great

Liked by 1 person

Physically Pandit may left, but his voice in our hearts forever..

मला संस्कृत येत नाही पण तुम्ही मराठी रूपांतर केल्या बद्दल धन्यवाद सर 👏👏

Liked by 1 person

Excellent.
Compare the texts in the first part with the one above the translation section. Very few discrepancies are there.
Second part is more accurate.
Great contribution from you!
I have no words as may do justice to your effort.
May Shiva bless you!

Liked by 1 person

Used two different devices for the post. As a result devanagari entries differ. I’ve rectified it to a great extent. Will complete the job a bit later. Plus the printed text varied a bit from the vocal version. And Panditji unbelievably has mispronounced some words.

Great of you to point out. A big thank you, Sir

Like

आम्ही जेव्हा हिमालयात ट्रेक ला जातो आणि भगवान शंकर च्या ठिकाणी जातो तेव्हा दररोज हे स्तोत्र म्हणत असतो.
त्याची परत आठवण झाली

Liked by 1 person

अवघड असलेलं शिव तांडव स्तोत्र मराठी अर्थामुळे सोपं वाटायला लागले. बरीच स्तोत्र संस्कृत मधून असल्यामुळे अवघड वाटतात जसे कालभैरवष्टकवगैरे.

Liked by 1 person

प्रयत्न करून त्याचा अर्थ कळतो. संस्कृत मध्ये शब्दांची फोड कळली की अर्थही कळतो, सर्व भारतीय भाषा संस्कृत मधूनच निर्माण झाल्या आहेत

Like

Really very interesting.
I didn’t know anything of this before .
And phenomenal voice of pandit Jasrajji .
It creates all together different atmosphere
Thank you for sharing this !

Liked by 1 person

नियमितपणे ऐकण्यात असलेले स्तोत्र त्याच्या कथेसह आणि अर्थासहित दिल्याबद्दल खूप धन्यवाद दादा…

Liked by 1 person

कित्येक स्तोत्रे लहान पणापासून म्हणत व ऐकत आलो.पण त्याचा अर्थ समजला की ती मनापासून म्हणावी किंवा ऐकावी वाटतात. तू नेहमीच निरूपण अर्थपूर्ण करतोस.

Liked by 1 person

*शिव ताण्डव स्तोत्र*….अतिशय सुंदर आणि समर्पक विवेचन ! पंडित जसराज यांचे सुश्राव्य गायन मनाला भावणारे! धन्यवाद सर.!🙏🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s