परवा भुपिंदर सिंह गेला आणि माझ्या काळजात चर्रर्र झाले. कोणीतरी घरचे किंवा अगदी जवळचे गेल्यासारखे झाले. लतादीदी जाऊन इनमीन पाच महिने झाले तेव्हढ्यात यानेही काढता पाय घेतला.
एका मूळ कोकणातील पोलिस शिपायाच्या लफंग्या चवचाल अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या माणसाने हिंदी चित्रपट सृष्टीत फालतू पाकड्याना घुसवले आणि उत्तम भारतीय गुणी कलाकारांना बाजूस ढकलले, आणि आमच्या सर्व बुजगावण्यांनी त्याची साथ दिली. आता ते बकरीसारखे भेसूर (बेसूर) बेंबटणाऱ्या झिपऱ्या लोकांना गायक का म्हणतात ते मला कधीच कळले नाही. पण काही लोकांचा हिम्मेश नावाचे एक कायम सर्दी झलेले कोकरू पण गाते असा गैरसमज आहे,त्याला काय म्हणायचे. मोदीजी आल्यावर लगेचच ही स्वतःला गायक म्हणवणारी रानडुक्करे एकदम पायांत शेपटी घालून का गायब झाली? त्यांच्या गायनकला (???) एकदम कशा अंतर्धान पावल्या हा एक संशोधनाचा विषय बनू शकेल.
असो, दोन दिवस भुपिंदर ची फडताळावर पडलेली गाणी त्यामुळे परत ऐकायला मिळाली. इतकी वर्षे बिचाऱ्याची इतकी सुंदर अविस्मरणीय गाणी लोकांच्या विस्मृतीत गेली होती, आणि आज दिवसभर त्याच गाण्यांचा मारा चालू आहे, दोन दिवसात ही सर्व चॅनेल्सना भुपिंदरचा परत एकदा विसर पडेल आणि राजकवी भा.रा.तांबे यांचे शब्द पुनः एकदा खरे ठरतील. मला तर खरेच वाटते की कोणी प्रसिध्द व्यक्ती निवर्तल्यावर या प्रसार माध्यमांना अमुक एक माणूस गेल्याचे भांडवल करायला मिळाले याचा आनंदच होत असेल. कित्येक संपादक आणि पत्रकार पेशंटनी मला सांगितले आहे की जवळजवळ सगळ्यांकडे प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीवरचे मृत्यूलेख लिहून नेहमीच तयार असतात, आणि काही महिन्यांनंतर त्यात योग्य ते फेरबदल करून ठेवले जातात. मधल्या काळात त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत झालेल्या बऱ्यावाईट घटना त्यात वाढवून ठेवतात.
मला राजकवींनी लिहिलेले अमर गाणे आठवले – https://youtu.be/L1Ekbkb8iNM
त्यात अगदी याच भावना व्यक्त केल्या आहेत. राजकवींची एक सवय म्हणजे ते कविता लिहून झाली की जागेचे नाव आणि तारीखही लिहून ठेवत. त्यामुळे ही कविता त्यांनी १८ ऑगस्ट १९२१ रोजी अजमेर च्या वास्तव्यात लिहिली असे खुद्द त्यांनीच लिहून ठेवले आहे. त्यामुळे महाराजांच्या जन्मतारखेसारखा विवाद उत्पन्न होऊच शकत नाही.
एखाद्या माणसाचा मृत्यू याचे अगदी वास्तव वर्णन त्यांनी केले आहे, तेही प्रथम पुरुषाच्या भूमिकेतून. जणू मरणारी व्यक्तीच बोलते आहे असे मांडले आहे!
जन पळभर म्हणतील
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?
मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?
राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?
मृत्यू ही प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील एकमेव शाश्वत घटना आणि त्याच्याबद्दल इतकी वास्तववादी भूमिका इतक्या वस्तुनिष्ठपणे घेणे हे ही स्पृहणीयच!
मनुष्य उगाचच या भ्रमात/चिंतेत/गैरसमजात आयुष्यभर राहतो की “माझ्यानंतर काय?”
या प्रश्नाचे इतके उत्तम उत्तर मी कधीच पाहिले नाही. या कवितेचे एका अजरामर गाण्यात रूपांतर केले आहे ते मराठी भावगीतांच्या मंतरलेल्या दुनियेतील एका पट्टीच्या कसलेल्या सुरांच्या जादूगाराने- वसंत प्रभू यांनी इतकी सुरेल रचना मल्हार रागात केली आहे आणि लतादीदींनी इतकी सुरेख गायली आहे की कोणीही (अगदी मराठी भाषा न जाणणारे ही) दाद दिल्याशिवाय राहणार नाहीत.
कवितेतील शब्द आणि अभिप्रेत भाव समजायला इतके सोपे आहेत की कोणालाही कळायला अवघड जाऊ नये. खरेतर वेगळे भाष्य करायची गरजच ठेवली नाही स्वतः राजकवी भा रा तांब्यांनी.
“आपल्या मृत्यूनंतर कुटुंब/गांव/समाज/देश/विश्व यांचे कसे अपरिमित नुकसान होणार आहे” हा विचारच सर्वांनी जितक्या लवकर स्वतःच्या अहंकारी भावविश्वातून तडीपार करता येईल तेव्हढे बरे होईल. कोणतेही एक माणूस नसल्याने विश्वाला काहीच फरक पडत नाही, ना ही कोणतीही व्यक्ती स्वतःचे दैनंदिन व्यवहारात काही काळ सोडून बदल होऊ देते. आत्मकेंद्रित असलेल्या मानवाच्या मनातच फक्त असा निरर्थक विचार येऊ शकतो.
आज गेलेल्या भुपिंदर वर स्तुतीसुमने वाहत असलेल्या सर्व वाहिन्या आणि प्रत्येक वर्तमानपत्र सुद्धा दोन चार दिवसातच त्याला विसरतील आणि पूर्ववत आपली निराशाजनक आणि खोडसाळ पत्रकारिताच परत चालू करेल. किती अचूक वर्णन केले आहे राजकवींनी ते परत एकदा ऐका: https://youtu.be/a_hso2jWScA
मित्रहो आतापुरते इतकेच! वाचा, विचार करा आणि आपल्या भावना व्यक्त करा! शुभरात्री!
24 replies on “आयुष्यावर बोलू काही…..”
सर जी निशब्द…सध्या सद्गुरूचे डेथ वाचतोय..पण आज हे सारे वाचले.. आणि खरोखर निशब्द झालो.. मराठी कवितेत अनेक धुरंधरांनी मृत्यूवर भाष्य केलंय..पण राजकवी भा.रा.तांबे एकमेवाव्दितीय…आज एकशे एक वर्षांनी सुध्दा हे काव्य काळजाला भिडते.जीवनाची वैयर्थतता जाणवून देते..हेच तर कालातीत काव्य.आमचे भाऊसाहेब पाटणकर सहज म्हणून गेलेत….
मरता आम्ही शोकार्णवी बुडतील सारे वाटले..
श्रद्धांजली तर जागोजागी देतील होते वाटले..
थोडे जरी का दु:माझे,असते कुणाला वाटले..
जळण्यातही स्मरणात मजला काहीच नसते वाटले…
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी..
कळलेच ना तेंव्हा कुणा कफनात जे रडलो आम्ही..
त्यांचेच हे उपकार, ज्यांनी झाकले होते मला..
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला…
लाभला एकांत जेव्हा सरणात त्या माझ्या मला..
जेंव्हा चिताही आसवांनी माझी विझाया लागली…
चिंता कसा जळणार आता याचीच वाटू लागली….
सर जी खूप गहन विषयावर अर्थपूर्ण लिखाण….
LikeLiked by 1 person
धन्यवाद, भाऊसाहेब पाटणकरांच्या कवितेसाठी अनेकानेक धन्यवाद!
LikeLike
Aniruddhaji, excellent collection & tasteful receipe of Apr songs!
LikeLiked by 1 person
Thanks Anilji
LikeLike
अगदी नेमक्या शब्दात वस्तुस्थिती मांडली सर आपण. भा रा तांबेचे गित तर जगाच्या अंतापर्यंत सत्य ठरेल…
LikeLiked by 1 person
धन्यवाद, खरे आहे
LikeLike
डॉक्टर साहेब अगदी सोप्या शब्दात परत एकदा खूप सुंदर सांगितले आपण..
LikeLiked by 1 person
धन्यवाद विनय जी
LikeLike
सुंदर कविता सर जी
LikeLiked by 1 person
अगदी खरे
LikeLike
किती वर्षांपूर्वी लिहीले आहे. दिवसेंदिवस क्षण लहान होत आहे.😔
LikeLiked by 1 person
हो १०१ वर्षांपूर्वी लिहिलेलं त्रिकालाबाधित सत्य
LikeLike
नैसर्गिक घटनांना आपण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्रास करून घेतो.
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
Life time ever green song!
LikeLiked by 1 person
Indeed Shekhar dada
LikeLike
🙏🙏👍
LikeLiked by 1 person
Thanks Ajit
LikeLike
खरं आहे…. हे गाणं मी जेव्हा लहानपणी एकलं तेव्हा त्याचा अर्थ तितकासा उमजला नाही पण त्याचे संगीत आणि स्वर मनावर कायमचे ठसले….जेव्हा अर्थ समजला तेव्हापासून तर ते अजूनच आवडते झाले आहे..
मोठ्या व्यक्तींचे मृत्यूलेख आधिच तयार असणे आणि त्यांच्या मृत्यूचे भांडवल केले जाणे हे असंवेदनशीलतेचे आणि अत्यंत क्रूर मनोवृत्तीचे लक्षण आहे…
लेख खूप छान लिहिला आहे….
शेअर केल्याबद्दल खूप खूप आभार अनिरुद्ध सर….
LikeLiked by 1 person
Thanks Kshama
LikeLike
खर पाहीलत तर अक्षरशः ह्या गाण्या सोबतच मी लहानाचा मोठा झालोय… मला अजूनही स्पष्ट आठवत रेडीओवर लहानपणी हे गाण लागल की…. हसूनी खिदळतील… शब्द जरा खटकायचा!
काय ते बालपण काय ती समज!!!!
नंतर ९ वीत अभ्यासक्रमातच होती… मातेकरसरांनी खूप सुंदर मन लावून शिकवली कविता तेंव्हा थोडा प्रकाश पडला…!!
पण… आज अशात मी जेंव्हा ऐकतोय तेंव्हा तो खरा अर्थ समजतोय. … कालजयी रचना त्या अशा… कुठे १९२१ कुठे २०२२🤔 पण लताजी काय किंवा भूपेंद्र काय मनाला ही कविता जाणवूनच जातात हे खरे
सर खूप आभार🙏🏾🙏🏾🙏🏾
LikeLiked by 1 person
धन्यवाद अनिलदा, माझे खूप आवडते गाणे आहे
LikeLike
फारच सुंदर कविता आणि लतादीदी च्या आवाजात ऐकू येणे… आहाहा… खूप सुंदर…
LikeLiked by 1 person
धन्यवाद जया
LikeLike