Categories
Devotional melodies Spiritual music

देवीचे स्तवन (आदि शंकराचार्य कृत):

शारदीय नवरात्र म्हणजे आदिशक्ती व तिच्या विविध रूपांचे नऊ दिवस पूजन! एक अफाट भक्तीसोहळा ! विश्वाचीच उत्पत्ती आदिशक्ती पासून झाली, खरेतर सर्व देव तिच्यापासूनच निर्मिले गेले अशी आपली धारणा आहे. सनातन धर्मात प्राचीन काळापासून स्त्रियांना सन्मान दिला गेला आहे, विश्वाची निर्मिती ही आदिशक्ती पासून झाली आहे असे सांगितले आहे. अशा पवित्र पर्वात त्या स्त्री शक्तीचीच एक आठवण परत करून दिली जाते.

आदि शंकराचार्य आपल्या सीमित ऐहिक आयुष्यात इतके मोठे कार्य करून गेले आहेत की मन स्तिमित होऊन जाते! त्या काळात संबंध भारतभर पायी भ्रमण करून देशाच्या चार टोकांना शंकराचार्य मठ स्थापन केले, आणि सनातन धर्माला येऊ पहात असलेली मरगळ झटकून टाकून नवसंजीवनी दिली. त्यांच्या सर्व साहित्यकृतींना एक स्वाभाविक गेयता आहे- मग ते भज गोविंदम असो किंवा आजच्यासाठी सुयोग्य असे हे महिषासुर मर्दिनी स्तोत्र असो. त्यांचे सर्वच साहित्य अमूल्य आणि चिरंजीव, चिरंतन आहे. उरलेले आयुष्य मी या थोरामोठ्यांच्या मनातले विचार त्यांच्या साहित्यातून जाणून घ्यायचा प्रयत्न करेन. पाहूया पुढे काय होते ते… https://www.youtube.com/watch?v=Np28O3Y_P2o

नवदुर्गा म्हणजे नऊ मुलींकडून हे स्तोत्र गाऊन घेतले आहेत कुलदीप पै यांनी. त्यांच्या रचना फार सुरेख असतात. आपल्या धर्माच्या कित्येक स्तोत्रांना त्यांनी स्वरबद्ध केले आहे, त्यांच्याबरोबर कित्येक वेळा सूर्यगायत्री ही लहानशी गायिका असते, ती फारच तयारीची गायिका आहे, सूर, ताल आणि लयीची फार उत्तम जाण एव्हढ्या कमी वयात आहे तिला.

आचार्यांच्या अनेक रचनांपैकी एक अविस्मरणीय रचना आहे हे महिषासुर मर्दिनी स्तोत्र. कित्येक वेळा ऐकून सुद्धा मला त्याची गोडी अवीटच वाटते. किती अप्रतिम, शब्दातीत, कालजयी रचना केली आहे पहा:

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते 

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

माझ्या मर्यादित कुवतीनुसार मराठीत त्याचा अर्थ समजावून सांगायचा प्रयत्न मी केला आहे, काही चुका माझ्याकडून झाल्या असल्यास आधीच आचार्य आणि आपली माफी मागतो. आपण जरूर दाखवून द्याव्यात, मला माझ्या स्वतःमध्ये सुधारणा करायला निश्चित आवडेल. आपले मतप्रदर्शन जरूर करा.

अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते।
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते ।

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

हे हिमालयाच्या कन्ये, विश्वाला आनंद देणाऱ्या, नंदी गणांकडून नमस्कृत, गिरीवर विंध्याच्या पर्वतशिखरावर राहणाऱ्या, साक्षात विष्णू ला खुश करणाऱ्या, इंद्राकडून नमस्कृत असणाऱ्या,  शिवाची पत्नी, विश्वात सर्वात मोठे कुटुंब असणाऱ्या आणि विश्वाला संपन्नता देणाऱ्या महिषासुर मर्दिनी देवी, आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

देवांना वरदान देणाऱ्या, दुर्धर आणि दुर्मुख असुरांना कंठस्थान घालणाऱ्या, स्वतः मध्ये हर्षित राहणाऱ्या, त्रैलोकांचे पोषण करणाऱ्या, शंकराला संतुष्ट करणाऱ्या, सर्व पापांचे हरण करणाऱ्या व घनघोर गर्जना करणाऱ्या, दानवांवर क्रोधीत होणाऱ्या, अहंकारी लोकांच्या गर्वाला शुष्क करणाऱ्या, समुद्राच्या पुत्री, महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो! 

अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

हे जगन्माते, माझ्या आई, प्रेमाने कदंब वनात राहणाऱ्या, सदैव हसतमुख राहणाऱ्या, हिमालयातील शिखरावरील आपल्या घरात विराजमान असणाऱ्या, मधासारखी गोड असणाऱ्या, मधु-कैटभ राक्षसाचा माज नष्ट करणाऱ्या, महिषाला विदीर्ण करणाऱ्या, नेहमी युद्धात गढलेली राहणाऱ्या, महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

शत्रूंच्या हत्तींच्या सोंडा कापून त्याचे शेकडो तुकडे करणाऱ्या, जिचा सिंह (देवीचे वाहन) शत्रूच्या हत्तींची शीरे धडापासून वेगळे करून तुकडे करून टाकतो, आपल्या हातातल्या अस्त्रांनी चंड आणि मुंड या राक्षसाची डोकी उडवणाऱ्या , महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

रणातल्या मदमत्त शत्रूंचा वध करणाऱ्या, अजर (चिरतरुण) , अविनाशी शक्ती धारण करणाऱ्या, प्रमथनाथ (शिव) यांची चतुराई ओळखून त्यांना आपला दूत बनवणाऱ्या , विकृत मति असलेल्या राक्षसांच्या दूतांच्या प्रस्तावांना अव्हेरणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

शरणागत आलेल्या शत्रूंच्या पत्नींच्या प्रार्थनेमुळे त्यांना अभय दान करणाऱ्या, तीनही लोकांना त्रास देणाऱ्या दैत्यांवर प्रहार करण्यासाठी योग्य असे त्रिशूळ धारण करणाऱ्या, देवतांच्या दुंदुभीतून “दुमि दुमि” आवाज दशदिशांतून पसरवणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिवशिवशुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

केवळ आपल्या हुंकाराने धूम्रलोचन राक्षसाला धुरासारखे (धूम्र) भस्मसात करणाऱ्या, युद्धात कुपित रक्तबीजाच्या रक्तापासून उत्पन्न इतर रक्तबीजाच्या रक्ताचे प्राशन करणाऱ्या, शुम्भ व निशुम्भ राक्षसांच्या बळीने शंकर व इतर भूत- पिशाच्चाना तृप्त करणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

युद्धभूमीवर जिच्या हातात कंगण धनुष्याबरोबर झळाळते, जिचे सोन्याचे शर (बाण) शत्रूंना विदीर्ण करून लाल होतात व त्यांच्या किंचाळ्या काढणाऱ्या, चारी सेनांचा (हत्तीदळ, घोड्यांचे दळ, रथदळ, पायदळ) संहार करणाऱ्या , अनेक प्रकारच्या ध्वनींची निर्मिती करणाऱ्या बटुकांची निर्मिती करणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

देवांगनांच्या तत्-था, थेयी-थेयी इत्यादी आवाजांत भावमय नृत्यात मग्न राहणाऱ्या, कु-कुथ आदी मात्रांनी युक्त विभिन्न मात्रांच्या तालात स्वर्गीय गाणी ऐकण्यात मग्न असणाऱ्या, मृदंगाच्या धू-धुकट, धिमि-धिमि इत्यादी गंभीर स्वर ऐकण्यात मग्न राहणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

जयजयकार करणाऱ्या व स्तुती करणाऱ्या अखिल विश्वाकडून नमस्कृत, आपल्या पैंजणाच्या किणकिणत्या आवाजाने भूतपती महादेवाला मोहित करणाऱ्या नटनट्यांच्या नायक अर्धनारीश्वर याने केलेल्या नृत्यात तल्लीन होणाऱ्या, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि सुमनःसुमनःसुमनः सुमनःसुमनोहरकान्तियुते
श्रितरजनी रजनीरजनी रजनीरजनी करवक्त्रवृते ।
सुनयनविभ्रमर भ्रमरभ्रमर भ्रमरभ्रमराधिपते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

अतिशय आकर्षक कांति आणि अतिशय सुंदर मनाने रजनीनाथ चंद्राच्या तेजाला आपल्या सुंदर चेहऱ्याने फिके पाडणाऱ्या, काळ्या भ्रमरांसारख्या सुंदर डोळे असणाऱ्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

सहितमहाहव मल्लमतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते
विरचितवल्लिक पल्लिकमल्लिक झिल्लिकभिल्लिक वर्गवृते ।
शितकृतफुल्ल समुल्लसितारुण तल्लजपल्लव सल्ललिते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

महायोद्धांच्या युद्धात मल्लिकेच्या फुलांसारखी नाजूक स्त्रियांच्या जवळ राहणाऱ्या, तसेच जुईच्या फुलांच्या सारख्या कोमल भिल्ल स्त्रियांसारखे नेहमीच चिलटांनी घेरलेली असलेल्या, चेहऱ्यावर कायम प्रसन्न भाव असलेल्या , चेहऱ्यावर सतत आनंदाने उत्पन्न असलेल्या उषेच्या किरणांसारखे व फुललेल्या लाल फुलांसारखे स्मित असणाऱ्या, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमतङ्ग जराजपते
त्रिभुवनभुषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

जिच्या कानातून सतत मद वाहत आहे, अशा हत्ती समान उत्तेजित असणाऱ्या गजेश्वरी, त्रैलोकीच्या आभूषणांनी सुशोभित (रूप-सौंदर्य, शक्ती, आणि कला) असणाऱ्या हे राजपुत्री, सुंदर हास्याने पुरुषांना मोहात पाडणाऱ्या मन्मथाच्या (कामदेवाच्या) मुलीप्रमाणे असणाऱ्या, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

कमलदलामल कोमलकान्ति कलाकलितामल भाललते
सकलविलास कलानिलयक्रम केलिचलत्कल हंसकुले ।
अलिकुलसङ्कुल कुवलयमण्डल मौलिमिलद्बकुलालिकुले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

जिची त्वचा कमळाच्या पाकळ्यांसारखी कोमल आहे, तसेच स्वच्छ आणि तेजोमय जिचे शीर आहे, हंसिनी सारखी जिचे चालणे आहे, जिच्यातून सर्व कला उद्भवल्या आहेत, जिच्या केसांत कमळाची आणि बकुळीची फुले आहेत, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

करमुरलीरव वीजितकूजित लज्जितकोकिल मञ्जुमते
मिलितपुलिन्द मनोहरगुञ्जित रञ्जितशैल निकुञ्जगते ।
निजगणभूत महाशबरीगण सद्गुणसम्भृत केलितले

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

जिच्या हातून निघणारा मुरलीचा मधुर आवाज कोकिळेला लाजवेल असा आहे, जी रंगीबेरंगी फुलांनी नटून डोंगरावर विहरते, पुलिंद स्त्रियांबरोबर मधुर, मनोहर गाणी गाते, जी सद्गुणसंपन्न शबरी स्त्रियांबरोबर खेळते, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

कटितटपीत दुकूलविचित्र मयुखतिरस्कृत चन्द्ररुचे
प्रणतसुरासुर मौलिमणिस्फुर दंशुलसन्नख चन्द्ररुचे
जितकनकाचल मौलिमदोर्जित निर्भरकुञ्जर कुम्भकुचे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ 

ज्यांच्या तेजाने चंद्राची कांति झाकोळून जाते, अशी सुंदर रेशमी वस्त्रांनी जिची कटी सुशोभित आहे, देव आणि दानव जिच्या समोर वाकल्या मुळे त्यांच्या मुकूटमण्यांनी जिच्या पायाची नखे चंद्रताऱ्यांसारखी चमकतात आणि जसे सुवर्णाच्या शिखरांवर विजय मिळाल्यावर हत्ती मदोन्मत्त होतो, तशा कलशाप्रमाणे उरोज असलेल्या , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

विजितसहस्रकरैक सहस्रकरैक सहस्रकरैकनुते
कृतसुरतारक सङ्गरतारक सङ्गरतारक सूनुसुते ।
सुरथसमाधि समानसमाधि समाधिसमाधि सुजातरते ।

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

हजारो दैत्यांना त्यांच्या हजारो हातांशी हजारो युद्धे जिंकणाऱ्या, सहस्रावधी हातांनी पूजली गेलेल्या, देवांना वाचवणारा सुरतारक उत्पन्न करणाऱ्या, त्याचे युद्ध तारकासुराबरोबर घडवून आणणाऱ्या, राजा सुरथ आणि समाधि नावाच्या वैश्याच्या भक्तिने समान प्रसन्न होणाऱ्या, हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे
अयि कमले कमलानिलये कमलानिलयः स कथं न भवेत् ।
तव पदमेव परम्पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

जे तुझ्या दयावान चरणकमळांची सेवा करतात, हे कमला, ते धनवान (कमलानिवास) बनल्याशिवाय कसे राहतील? हे शिवे! तुझे चरणकमळच परमपद आहेत, तेव्हां त्यांचे ध्यान पूजा करून मला परम पद प्राप्ती कशी होणार नाही? हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति तेगुणरङ्गभुवम्
भजति स किं न शचीकुचकुम्भतटीपरिरम्भसुखानुभवम् ।
तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम्

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

सोन्यासारख्या चमकणाऱ्या नदीच्या पाण्याने जे तुझ्यावर शिडकावा करतील त्यांना इंद्राने शचीला आलिंगन दिल्यासारख्या सुखाची अनुभूती निश्चितच होईल! हे वाणी (सरस्वती)! तुझ्यामध्ये मांगल्याचे स्थान आहे, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे! हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु कूलयते
किमु पुरुहूतपुरीन्दु मुखी सुमुखीभिरसौ विमुखीक्रियते ।
मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

तुझा नितळ चेहरा निर्मळ चंद्रासारखा आहे, जो सर्व अशुद्धीना दूर करतो, म्हणूनच माझे मन इंद्रपुरीच्या सुंदर स्त्रियांच्या मनासारखे झाले आहे, त्यांच्यापासून विन्मुख नाही झाले. तुझ्या कृपेशिवाय शिवधनाची प्राप्ती कशी होऊ शकेल? हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे
अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासिरते ।
यदुचितमत्र भवत्युररीकुरुतादुरुतापमपाकुरुते

जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥

दीनांवर दया करणाऱ्या उमादेवी! हे जगतजननी माझ्यावर दया कर! जशी तू इतरांवर दयेचा वर्षाव करतेस, तसेच शरवर्षाव ही करतेस (बाणांचा वर्षाव) , म्हणून तुला या वेळी जसे उचित वाटेल तसे माझे पाप आणि ताप दूर कर , हे महिषासुराचे मर्दन करणाऱ्या , आपल्या केसाच्या बटांनी आकर्षित करणाऱ्या पर्वताच्या पुत्री भगवती, तुझा जयजयकार असो!

आदि शंकराचार्य यांनी लिहिलेले हे विलोभनीय स्तोत्र पूर्ण झाले.

मला मैथिली ठाकूर खूप आवडते. खूप सामान्य परिस्थितीतून अपार कष्ट करून ती व तिचे दोन भाऊ वर येऊ पाहताहेत. ती खूप प्रकारची गाणी उत्तम म्हणते, अगदी पाश्चात्य सुद्धा! तिचे स्तोत्रगायन ही अप्रतिम आहे:      https://www.youtube.com/watch?v=DEGcIi9aij8

आज नवरात्रात षष्ठीला हे काम मी पूर्ण करू शकलो, याचा आनंद होतो आहे. देवीच्या चरणी अर्पण! तिची कृपा तुम्हा-आम्हां सर्वांवर राहो, अशी प्रार्थना……

आपल्या प्रतिक्रिया आणि विचार निश्चित व्यक्त कराव्यात.

By abchandorkar

Consultant Interventional Cardiologist, Pune, India

18 replies on “देवीचे स्तवन (आदि शंकराचार्य कृत):”

अप्रतिम स्तोत्र….👌👌🙏🙏 फारच सुंदर अर्थ लेखन….🙏🙏 वीणा श्रीवाणी यांचे वीणेवर वाजवलेले हे स्तोत्र पण खूप सुंदर आहे….

Liked by 1 person

सर जी🙏🙏केवळ अद्भुत..धन्य जाहलो..अत्यंत सुंदर मराठी भावार्थ…शब्दात व्यक्त होणे अल्पमतीमुळे शक्य नाही.. निशब्द….

Liked by 1 person

आचार्यांच्या प्रतिभेची कमाल आहे, आपण फक्त आस्वाद घ्यायचा आणि त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे.

Liked by 1 person

Khoop sunder shabdat tumhi evdhya mahan stotrache vivechan kele. Dhanyawad sir.👌🏻👌🏻
He aiktana aaplyat veglich urja yete, ani aapan mhanu lagto. Aai Bhavani, saglyana sukh, samadhan, shanti pradaan karo, navratri chya sarvana shubheccha!!

Liked by 1 person

फार सुंदर विवेचन केले आहे! स्तोत्र माहिती असते पण इतका सखोल अभ्यास व भावार्थाचा विचार केला जात नाही….आपल्यामुळे आम्हाला तो वाचायला मिळाला याबद्दल आपले आभार मानावे तितके कमीच आहेत 🙏🙏

स्त्रीत्वाचे विविध पैलू फार सुंदर आले आहेत स्तोत्रात🙏

Liked by 1 person

जगद्गुरु शंकराचार्यांची काव्यरचना, श्री.कुलदीप पै यांची स्वररचना, आणि आपण केलेले काव्यरचनेचे भावांतरण, सारेच अद्भुत.
आतापर्यंत अनेक वेळा ही रचना मी ऐकली असेल,पण आज मला तिचा अर्थ समजून घेण्याची बुद्धी झाली.
ही काव्यरचना,गीत व विश्लेषणाच्या सादरीकरणाबद्दल आभार.

Liked by 1 person

हे स्तवन माझे अत्यंत प्रिय स्तोत्र आहे. ह्याचे शब्द ध्वनी प्रमाणे नाद करतात. फार सुंदर विवेचन 🙏

Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s