आज ९ जानेवारी- १९३४ साली अमृतसर येथे जन्मलेल्या आणि संगीताची अनावर ओढ असलेल्या गायकाचा जन्मलेल्या- महेंद्र कपूरचा वाढदिवस ! खूप कष्ट करून त्याकाळी हिंदी चित्रपट सृष्टीत चार मोठे गायक प्रस्थापित असताना – (म्हणजे मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे) आणि एक पाचवा तलत महमूद एक अतिशय वेगळ्या गळ्याचा गायक असताना- येऊन स्वतःचे स्थान मोठ्या कष्टाने याने सगळ्यांच्या नाकावर टिच्चून निर्माण केले.
हिंदी चित्रपटांमध्ये खूप प्रसिद्ध गाणी गायल्यानंतर त्याने इतर बऱ्याच प्रकारची हिंदी गाण्यांचे प्रकार लीलया हाताळले, उदाहरणार्थ दोहे, मंत्र, स्तोत्र, चौपाई गायले . त्याने त्याचे खास सुहृद बी आर चोप्रा यांनी टी व्ही साठी बनवलेल्या महाभारत साठी सुद्धा शीर्षकगीत म्हटले. महेंद्र कपूर यांचा दुसरा अतिशय लाडका कलाकार म्हणजे मनोज कुमार! त्याने तर रफी-तलत यांचे ध्वनिमुद्रित झालेले गाणे, “मला तलत चा गळा अजिबात शोभत नाही” असा हट्ट करून परत रफी-महेंद्र कपूर असे परत एकदा ध्वनिमुद्रित करायला लावले.
मराठी भाषेतील अमराठी भाषिक असूनही गाणाऱ्या गायकांमध्ये निश्चितच त्याने सर्वात जास्त म्हटली आहेत. शाहीर दादा कोंडके यांच्या चित्रपटात जणू त्याची मक्तेदारीच होती. गम्मत म्हणजे दादा नेहमी खेडवळ किंवा अर्धशिक्षित, साध्या भोळ्या नायकाच्या भूमिका करत आणि त्यांच्या तोंडी जनमानसात लोकप्रियता मिळवण्यासाठी मुद्दाम ग्रामीण भाषेत संवाद घातले जात. अशावेळी महेंद्र कपूर दादांना इतर सर्व गायकांपेक्षा का जास्त भावला हे मला आजपर्यंत न उलगडलेले गूढ आहे. पण ही जोडी एकदम लोकप्रिय झाली हे मात्र निश्चित! कोणी कोणास जास्त मदत केली असा विचार करण्यापेक्षा दोघेही एकमेकांना पूरक ठरले हे मात्र निश्चित!
महेंद्र कपूर यांनी भावगंधर्व बाळासाहेब म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतरचनेवर एक गायलेले गाणे मला खूप आवडते. या गाण्यात एक तालबद्ध आणि ठसक्यात गाणारा महेंद्र कपूर दिसतो. आरती प्रभू यांचं काव्य, बाळासाहेबांच्या कलात्मक दृष्टीतून साकार झालेली (त्यांच्यासाठी बऱ्याच वेगळ्या धर्तीची) एक अतिशय सुश्राव्य व धुंद करणारी रचना आणि महेंद्र कपूर यांनी अपेक्षित त्या पद्धतीने गायलेले गाणे! अगदी दुग्धशर्करा, मणिकांचन वगैरे योग जुळून आल्यासारखे जमले आहे. ऐका: https://youtu.be/UmGCHkG4CFo
आरती प्रभू म्हणजे खरे तर शब्दप्रभूच! काय मस्त काव्य आहे पहा:
ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन् जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते.
येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ‘नाही’, ‘हो’, ही म्हणते.
येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते.
अशा कविता चालीत बांधणे म्हणजे संगीतकाराची परीक्षाच! इतरांना अवघड वाटणारी कविता लीलया गोड चालीत बसवावी तर फक्त एखाद्या पोचलेल्या संगीतकाराने! एखादी विचित्र वाटणारी कविता, ज्यात ओळींची लांबी, यमक, काहीच एकसारखे नाहीये त्यावर गाणे करावे तर (हिंदीत गुलजार च्या कवितांवर) पंचम उर्फ राहुलदेव बर्मन आणि मराठी भाषेत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच! यापेक्षा याचे उत्तम उदाहरण काय असू शकते? कविता खास आरती प्रभूंच्या पध्दतीची आहे, त्याला ऐकण्यास सुश्राव्य पण गाण्यासाठी अतिशय अवघड अशी बाळासाहेबांची चाल, समर्थपणे हे शिवधनुष्य पेलले आहे महेंद्र कपूर यांनी! म्हणूनच मला हे गाणे खूप आवडते. https://youtu.be/nZVO1q0fTOs
महेंद्र कपूर यांच्या काही लाईव्ह कार्यक्रमांना हजर राहायची संधी मला मुंबईतील एक जुन्या पिढीतील हृदयरोग तज्ज्ञ, डॉ बाळकृष्ण गोयल यांच्यामुळे. डॉ गोयल यांची महेंद्र कपूर यांच्याबरोबर गट्टी जमली होती. त्यामुळे ते जमेल तेव्हा महेंद्र कपूर नाईट चा कार्यक्रम आयोजित. ध्वनिमुद्रण कक्ष आणि प्रत्यक्ष सभागृहात गाणे यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक. पण महेंद्र कपूर यांच्या बाबतीत ही तफावत फारशी जाणवायची नाही. खूप मृदू स्वभावाचा निगर्वी गायक. आज हयात असते तर ८८ वर्षांचे झाले असते.
कालाय तस्मै नमः!
केवळ कष्टांच्या बळावर दाटीवाटीने अतिरथी-महारथी असताना ही स्वतः चे वेगळेपण दाखवून स्थान निर्माण करणारा हा गायक!
वाढदिवसाच्या निमित्ताने आज पुनः एकदा आठवणींना उजाळा मिळाला!
लोकहो, शुभ रात्री! थंडी उशिरा का होईना, पडू लागली आहे, काळजी घ्यावी
18 replies on “आपलं वेगळेपण ठसवणारा गायक…..”
आरती प्रभू यांच्या कवितेला महेंद्र कपूर यांनी चांगला न्याय दिला आहे
खरतर ही कविता म्हणून ही पटकन उमजणारी नाही
असं ऐकलं आहे की आरती प्रभू यांनी ही कविता कवीच्या प्रतिभेला उद्देशून केली आहे
वरकरणी प्रेम कविता वाटणारी पण काही वेगळाच गर्भितार्थ असणारी ही कविता
याचं गीत होताना ते समर्थपणे पेलू शकणा रा गायकच हवा होता
महेंद्र कपूर यांनी मातृ भाषा मराठी नसूनही ही जबाबदारी उत्तम पार पाडली आहे
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ कामत
LikeLike
सुंदर कविता.
LikeLiked by 1 person
खरे आहे
LikeLike
वाह..
एकदम मस्त..
कविता, गायन, संगीत , कवितेची चाल सगळंच सुंदर 👌🌹
LikeLiked by 1 person
Thanks
LikeLike
Khoopach Sundar Great Mahendra Kapoor Dada Music Dada
LikeLike
Indeed.
LikeLike
हर इक बेज़ा तकल्लुफ़ से बग़ावत का इरादा है
Mahendra Kapoor sang very sweet.
Some Marathi songs with Asha Bhosle if I remember right.
LikeLiked by 1 person
He was brave, hard working and had enough faith in himself to carve a niche in a crowded place with established greats
LikeLike
अतिशय सुश्राव्य गीत!
कविता, संगीत, गायन…👍👍🙏🙏
खरंच प्रतिभेची हुलकावणी अशा प्रतिभावान मंडळींना किती प्रकर्षाने जाणवत असेल!
LikeLiked by 1 person
अतिशय सुश्राव्य गीत!
कविता, संगीत, गायन…👍👍🙏🙏
खरंच प्रतिभेची हुलकावणी अशा प्रतिभावान मंडळींना किती प्रकर्षांने जाणवत असेल!
LikeLiked by 1 person
अतिशय सुश्राव्य गीत!
कविता, संगीत, गायन …सगळेच अप्रतिम 🙏🙏👍👍
खरंच प्रतिभेची हुलकावणी अशा प्रतिभावान मंडळींना किती जाणवत असेल!
LikeLike
खरे आहे अर्चना जी
LikeLike
खरे आहे अर्चना जी, कबूल
LikeLike
Indeed
LikeLike
Very true
LikeLike
Thanks
LikeLike