Categories
Environment Inspiration Nature Serenity Sunrise

बस यूँही……….


.
.
The dawn of a new day signifies a continuum,
Lighting up new dreams and aspirations,
Moving on from disappointments and failures of the past,
Starting a new leg of the journey anew,
Writing a new page in the story…..
.
#Sunrise,
#Aspirations,
#Nature
#Naturescapes
#Hope_Springs_Eternal
#Hopelessly_In_Love_With_Nature

Categories
Introspection Serenity

बस यूँही……..


.
.
A picture posted by a friend on her FB wall set off a chain of thought.
.
The human mind is very imaginative and can see situations where they may not exist…
.
#Random_Thoughts
#Dreams
#Different_Perspective

Categories
Introspective melodies Marathi Poetry Serenity Spirituality

अशाच एका दिवशी….

आज ४ सप्टेंबर! ही तारीख मी कधीच विसरू शकत नाही.

•आज एक शिवधनुष्य उचलण्याचे धाडस करतो आहे. एखाद्या दिवशी कविता किंवा गाणे कोणते आठवेल याचा काही नेम नाही, कित्येक वेळा मी पहाटे नेहमीच्या वेळी उठतानाच डोक्यात एखादे गाणे सतत फिरत असते, आदल्या रात्री ते ऐकले नसते,एव्हढेच नव्हे तर कित्येक वेळा त्या गायकाची गाणी सुद्धा ऐकलेली नसतात. पण असेच काहीतरी मनात घुमू लागते आणि अखंड चालू राहाते.

आज मला माझ्या आयुष्यातील समजायला सर्वात जास्त अवघड वाटलेले कवी ग्रेस यांची एक कविता आठवली. तसे बाबा वायुदळात असल्याने माझे लौकिक शिक्षण भारतभर एअर फोर्स स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांत झाले. शालेय शिक्षण सुरू होण्यापूर्वी (मी एकटा असताना, म्हणजे माझ्या बहिणीच्या जन्माआधी) आम्ही चिनी लोकांनी लादलेल्या युद्धाच्या आधी आणि नन्तर आसाम मध्ये तेजपूर येथे होतो. तेव्हा वेळ जाण्यासाठी म्हणून आईने पुण्यातील माझ्या मावशी/आत्याला सांगून मराठी गोष्टींची पुस्तके अप्पा बळवंत चौकातून मागवली, तेव्हा अस्मादिकांचे शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झाले. मी , आई आणि पुस्तके ही आमची शाळा. आमच्या शाळेत फळा नव्हता! एक शिक्षक, एक विद्यार्थी आणि वेळेचे बंधन नाही. एक पाटी (त्याकाळी दगडी पाटी असे, पत्र्याच्या पाट्या नन्तर आल्या) आणि पेन्सिल! त्यामुळे माझ्या आजच्या कविता समजण्यात त्रुटी राहिल्या असल्यास चू.भू.द्या.घ्या. !!

ग्रेस म्हणजे एक अवलिया कवी. प्रत्येक वेळी तीच ओळ वाचून वेगळा अर्थ लागतो. तेही म्हणत की मी माझी कविता कधीच समजावून देणार नाही- तुम्हांला वाचून जो लागेल तोच अर्थ!

सर्वप्रथम आज दिवसभर माझ्या डोक्यात चाललेल्या गाण्याबद्दल! ग्रेस, हृदयनाथ, लता हे त्रिकूट जमले की एक अविस्मरणीय अनुभव ठरलेलाच. त्या तिघांच्या ठायी ईश्वरी वरदानच आहे, प्रत्येक आपापल्या परीने दिग्गजच! पण त्यांना एकमेकांविषयी बोलताना ऐकावे: प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल वाटणारा अतीव, असीम, स्नेहादर आपल्याला कळून येतो.

आज तिघांपैकी फक्त बाळासाहेब उरले आहेत! कालाय तस्मै नमः! आधी मार्च १२ मध्ये ग्रेस आयुष्याच्या रंगमंचावरून विंगेत निघून गेले, मग ६ फेब्रुवारी २२ ला दीदी ही कालवश झाल्या. बाळासाहेब मंगेशकरांनी ही कविता स्वरबद्ध केली आणि त्यांची रचना म्हणजे दीदी किंवा आशाताई गाणारच! महाश्वेता नावाच्या दूरदर्शन मालिकेत हे गाणे आले आहे तरीही अत्यधिक लोकप्रिय झाले. महाराष्ट्रात कुठेही हे गाणे एकदा सुद्धा न ऐकलेले कोणी असेल असे मला खरेच वाटत नाही. https://youtu.be/x88r7JI4ljU

गाण्याची सुरुवात मला नेहमीच उंबरठा चित्रपटातील एका गीतासारखी वाटते. दोन्हीही शेवटी बाळासाहेबांच्याच रचना! आणि यमन हा खूप कर्णमधुर राग आहे, त्यावर आधारित खूपच रचना आहेत. सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरीशी एकदम जुळणाऱ्या कथानकावर सुधा मूर्ती (इन्फोसिस चे नारायण मूर्ती यांच्या सुविद्य पत्नी) यांनी कन्नड भाषेत ही कादंबरी लिहिली. त्यावर ही दूरदर्शन मालिका तयार झाली. त्यासाठी वापरले असूनही हे गाणे खूप गाजले आणि लोकप्रिय ही झाले.

ही मूळ कविता ग्रेस यांनी निष्पर्ण तरुंची राई या नावाने लिहिली आहे. चंद्रमाधवीचे प्रदेश या काव्यसंग्रहात ही प्रसिद्ध झाली होती.

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते।।धृ।।

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती

देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब

संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई

चंद्रमाधवीचे प्रदेशग्रेस

(मूळ कविता मोठी आहे, गाणे बनवताना कित्येक वेळा सबंध कविता वापरणे शक्य नसते, तसे केल्यास खूप लांब होईल आणि तेव्हढा वेळ उपलब्ध असतोच असे नाही, या कवितेतले धृपद धरून फक्त आठ ओळी गाण्यात आल्या आहेत, त्या वर वेगळ्या दर्शवल्या आहेत)

या कवितेची किमान १५-२० वेळा पारायणे केली असतील, पण दर वेळी वेगळी अनुभूती होते. आजच्या दिवशी (कदाचित आजच्या दिवसामुळेही असेल) सुचलेला अर्थ मी व्यक्त करतो आहे, ग्रेस यांच्या कवितेचा कधीही एक अर्थ लागणारच नाही. त्यामुळे हाच आशय त्यांनी मांडला आहे असली विधाने मी करणार नाही. मी जेव्हढे जास्त वाचतो तेव्हढ्या वेळा मला माझ्या अज्ञानाचीच जाणीव प्रकर्षाने होते. त्यामुळेच आटा लिटर मध्ये मी अजून मोजत नसेन.

भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते एका जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच्या मनात उमटलेले भाव असावेत. या जगात जन्मलेल्या सर्व जीवांना मृत्यू निश्चित आहे हे माहीत असूनही त्याचे भय निरंतर वाटत राहावे हा मोठा दैवदुर्विलासच नाही का? माझ्या आयुष्याची संध्याकाळ सुरू झाल्यावर मला तू शिकवलेल्या सर्व गोष्टी (“गीते”) आठवतात. सर्वच उतार वयातील व्यक्ती जुन्या जुन्या आठवणी काढून त्यातच रममाण होतात. शिकवणारा अर्थातच माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत मोठा असणे असणार. ही व्यक्ती आपली सर्वच बाबतीत शिक्षक असणारी कोणीतरी वडीलधारी व्यक्ती किंवा अगदी जगद्गुरू साक्षात ईश्वर ही असू शकेल. आयुष्याच्या शेवटी आपल्याला या शिक्षकाची आठवण न आल्यासच आश्चर्य वाटेल.

ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया मला वाटते की लोकांच्या प्रेमाचे /स्नेहाचे/आपुलकीचे व्यक्त होण्यातला स्वाभाविक निर्माण होणारा कमीजास्तपणा यात दर्शवला आहे. चंद्राच्या महिन्याभरात बदलणाऱ्या कलाही तेच दर्शविते. भगवा रंग वैराग्य, अनास्था, स्थितप्रज्ञता दाखवणारा आहे. धरती हे जननीचे प्रतीक आहे जी सर्व जीवांना जन्म देते आणि सर्वांवरच एकसारखे प्रेम करते. झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया ही ओळ मला सरळसरळ जीवन-मरण-पुनर्जन्म ही अव्याहत चालणारी चक्राकार मालिकाच दाखवते आहे. आपण कोणाच्या तरी सावलीत बीजरूपात जन्माला येऊन वाढलो, आपण वृक्षासारखे मोठे झालो आणि दुसऱ्याला जन्म दिला, पोषण केले आणि त्याच वृक्षाच्या पायाशी कायमचे निजलो, हा निसर्गाचा नियमच दाखवून दिला आहे.

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला ह्या ओळी एकदम वेगळ्या वाटत नाहीत का? आयुष्याच्या अखेरीस द्विधा मनस्थितीत असताना कोणीतरी सत्याची प्रचिती करून देतो, एखाद्या मुमुक्षुला भवसागर पार करून जायचा मंत्राचाच साक्षात्कार करून देतो, तसा ‘तो बोल’ हळुवार स्पर्श करून दोलायमान झालेल्या मानवी मनाला शांत करून गेला, लंकेतल्या बंदिवासात श्रीरामाची निशाणी हनुमाना कडून मिळाल्यावर सीतामाई शांत झाली (कवीने आपले स्वातंत्र्य वापरून अंगठी ऐवजी श्रीरामाचा शेल्याचा उल्लेख केला आहे) असा काहीसा अर्थबोध मला झाला.

स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे आयुष्यभर “स्व”केंद्रित राहून आपण आपल्याच दुःखाचे गाणे गात राहातो, ईश्वराच्या सान्निध्याची जाणीव मात्र चंद्राच्या शीतल प्रकाशासारखे सर्व सत्य स्पष्ट आणि आपल्या दृष्टीला त्रास न देता दाखवते, तशीच आयुष्यातील एकमेव चिरंतन सत्याची जाणीव झाल्यामुळे मनातील कोलाहल शमला, विचारांना स्थैर्य आले. https://youtu.be/BoYXtr0C_YE

आज गाण्यात घेतलेल्या ओळींचाच विचार मी केला, परत वेळ मिळेल तेंव्हा निश्चितच उरलेल्या कवितेवर विचार करीन, तेंव्हा काही दिवसांनी नक्की परत येऊन पहा- एक दोन दिवसांत नक्कीच पूर्ण करेन.

आता एवढेच पुरे. ग्रेस यांच्या कवितेचा थांगच लागत नाही हे खरे. मला तर अगदी खरे सांगायचे तर जडच जाते. मित्रहो तुम्हीही विचार करा, तुम्हाला काय जाणवले ते निश्चितच व्यक्त करा!

शुभरात्री

Categories
Flowers Introspection Memories Nature Pure joy Serenity

बस यूँही….


.
The flip side of solitude. Having to stay by yourself for too long without any interaction with others may make one incapable of simple human activity.
.
Gomphrena globosa, commonly known as globe amaranth, is an edible plant from the family Amaranthaceae.  The rounded, globular inflorescence is a striking, visually dominant feature of the plant that has been engineered by selective cultivation to get shades of magenta, purple, red, orange, white, pink, and lilac. Within the flowerheads, each individual flower is quite small and inconspicuous.
.
Gomphrena globosa is originally from Central America, but is now grown globally. As a tropical annual plant, G. globosa blooms continuously throughout summer and early fall. It is very heat tolerant and fairly drought resistant, but grows best in full sun and regular moisture. This is one of my earliest tele pics and I love it. I was able to zoom only on the single inflorescence with the vegetation in the background getting blurred to a uniform, formless green.
.
#Flowers ,
#Nature,
#Nature_photography
#Hopelessly_In_Love_With_Nature

Categories
Nature Serenity Sunrise Sunsets

बस यूँही….


.
.
.
The indescribable magic of the golden hour.
.
The sky is suffused with molten gold. The horizons stay lit for a period that extends beyond the sunset, and before the sunrise.
.
#Nature ,
#SunsetSky
#Morning_Mood_Elevation
#Beauty_Around_Us

Categories
Devotional melodies Introspective melodies Serenity

कृष्णार्पणमस्तु…

आज कालाष्टमी: श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजे कालच्या कृष्णजन्माच्या मध्यरात्रीच्या सोहोळ्यानंतरचा दिवस! या दिवशीच संतश्रेष्ठ व खऱ्या अर्थाने युगप्रवर्तक असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस! आजच्या दिवशी पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघायचे. माझ्या आयुष्यात सर्व मोठ्या गायकांना खूप ऐकायला-बघायला मिळाले. सर्वच आपापल्या परीने थोर. पण शुद्ध भक्तीरसासाठी सर्वात पहिले नाव मी घेईन ते म्हणजे स्वरमार्तंड पंडित जसराजजींचे. कित्येक दशके त्यांना ऐकूनही मन पूर्णपणे संतुष्ट झाले नाही, कदाचित होणारही नाही. प्रत्येक वेळी एखाद्या श्लोकाने सुरुवात करून सगळे वातावरण पवित्र करणारा हा सत्पुरुष. त्यांच्या आवाजात ती ईश्वरस्तुती ऐकली की आपोआपच मन एकाग्र व्हायचे आणि त्यातून त्यांच्या गायनाचा प्रभाव निश्चितच जास्त होई. कानांतून मनात आणि मनातून खोलवर माझ्या, तुमच्या, सर्वांच्या आत्म्याला गवसणी घालणे त्यांना सहज जमायचे, प्रत्येक वेळी, न चुकता. आणि त्यांची शैली इतकी मोहक असे की सगळा श्रोतृवृंद त्यांच्या स्वरांच्या प्रवाहात वाहत जाई, तनमन, देहभान विसरून त्या कालौघात बुडून जाई. गुरुजींचे गाणे म्हणजे साक्षात अमृताचा वर्षाव: जीवनाच्या अनुदिनी अनुतापे पोळलेल्या सर्व जीवांना संजीवनी देणारेच स्वर! माझे नशीब की त्यांचे गाणे ५ दशके ऐकता आले, त्यांना भेटण्याची संधी सुद्धा मिळाली आणि त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वाची ओळख करून घेता आली. त्यांच्या भेटीची निशाणी अजून माझ्या खिशात कायम ठेवली आहे. आजच्या दिवशी त्यांच्या या भक्तिभावाने ओतप्रोत रचनेशिवाय दुसरी कोणतीही ऐकणे उचित ठरू शकतच नाही! https://youtu.be/tujcCI6MLD0

ऐका: सुरुवातीला कितीतरी वेळ तानपुरा, थोडीशी पेटीची हलकीशी लकेर, आणि मंत्रमुग्ध करणारा पंडितजींचा आवाज. देवाजीने या सत्पुरुषावर खूप कृपा केली आहे. त्यांच्या इतकी स्तोत्रे , श्लोक आणि ईशस्तवन कोणीच गायले नाही. प्रत्येकाची खासीयत की कितीही वेळा गायले तरी कंटाळा येत नाही. मी ग्रामीण भागात आयुष्याची जवळजवळ तीस वर्षे फिरलो. महाराष्ट्रात इतक्या छोट्या छोट्या गावांत फिरलोय की प्रत्येक रुग्णाच्या गावाच्या आसपास मी गेलोय. अजूनही प्रत्येक प्रवासाची सुरुवात मी जसराजजी यांच्या अमर संपूर्ण शिवमहिम्न स्तोत्र ऐकतच करतो. पहाटे प्रवासाची सुरुवात करत असल्याने त्या वेळी दुसरे संगीत ऐकायची इच्छा होतच नाही.

आज कालाष्टमी ला दुसरे काही ऐकण्याची गरज नाही. भक्तीचा शांत प्रवाह जसराजजी पटकन ओढ असलेल्या डोहात रूपांतरित करतात, आणि आपल्याला ओढून घेतात. त्यांच्या स्वरजालात आपण कधी गुरफटलो गेलो हे कळतच नाही, आणि कळले तरी सुटावे असे वाटतच नाही.

त्यांची ही संमोहिनी प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी कालौघात हिरावली आहे. पण आपल्या नशिबाने कित्येक दृष्यफिती उपलब्ध आहेत: दिल्लीच्या इंडिया गेट वर झालेल्या या कार्यक्रमात पहा- श्रोते कसे हरखून आणि हरवून जातात. भक्तीच्या प्रवाहात संपूर्ण समर्पण करण्यात काय मजा आहे ते कळते : https://youtu.be/J8S6lXsXry0

हा निखळ निर्मळ आनंद आणि समाधान आपणा सर्वांना सतत मिळो हीच योगीश्वर श्रीकृष्णचरणी प्रार्थना.

माऊलींच्या वाढदिवसाचे महत्व मराठी माणसाला वेगळे सांगायची गरजच नाही. त्यांच्या उण्यापुऱ्या २१ वर्षांच्या भौतिक आयुष्यात त्यांनी जे मिळवले ते कळायला आपण सर्व मिळून १००० वर्षे प्रयत्न करतोय पण माऊलींचा थांग लागत नाही.

माझे आवडते पसायदान ऐकवतो. स्वतः पुरते न मागता संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीवासाठी मागणी करणारा हा योगीश्रेष्ठ! आपल्यापाशी जे होते ते इतरांना देऊन मोकळा झाला! https://youtu.be/DQTKecWB9OM

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

आपण सर्वांनी ही सुखी व्हावे आणि रहावे… शुभरात्री|

कृष्णार्पणमस्तु||

Categories
Environment Human nature Serenity

बस यूँही…….


.
.
It is always a source of amazement to me, the near universal denial of what is certain and unchangeable: every being in the universe is guaranteed the journey of life will definitely draw to an end, while someone else starts on theirs. The acceptance of the inevitable as a natural culmination might just reduce the fear it always manages to invoke. Our ancient sages and their priceless advice touches upon the necessity of (& ways to) defeat this fear….
.
.
#Iter_Vitae,
#Journey_Of_Life,
#The_Unchangeable_Truth

Categories
Friendship Introspection Pure joy Serenity

बस यूँही…….


.
.
The power of dreams..

Humans tend to think of unfulfilled desires in their dreams, see people and places we have met a long time ago in the inner eye.
.
What would dogs think and dream of? The man who would discover that would surely get the Nobel Prize.
.
Surely man would be very happy to discover what’s going on in his best friend’s mind.
.
#Animal_Minds
#Canine_Love
#Peace
#Inner_Universe
.
.
क़ल्बी: दिली, heartfelt,
जमील: सबसे खूबसूरत

Categories
Introspection Serenity Sunsets

बस यूँही……

The skies were suffused for a fleeting moment with an unreal celestial magical show just after sunset. I could feel the leash I once held so often tug at my hand insistently as my furry son grew impatient at my standing still admiring His painting skills. I could sense his presence, after all I was proximate to his forever resting place. He had, as was his habit, moved on ahead and seemed to stop and look back to see if I would follow him, which I definitely will, another day.

I was reminded of this sublime piece of verse:

Walking into a golden sky

By D I Harrison

Walking into a golden sky

When I start and walk alone,

Rain, dark storms folding about me,  

When I need  a person – you –

And you were just here,

Now departed,

I shall never walk alone,

For you are here, but just now

You’re at a different here,

And yet here the silver lark’s song is heard

(by us both).

#Remembrance,

#Solitude,

#Unconditional_Love

The picture has been shot without any filters and has not in any way been postprocessed.

Categories
Bageshree Nocturnal melodies Serenity

A melody for the night….

I was contemplating for a few minutes after dinner and it struck me we were a few minutes away from 9 pm. In the Hindustani Classical Music thought, 9 pm to 12 midnight is the time for Bageshree. A beautiful raag,  it is meant to depict the emotion of a woman waiting for reunion with her lover. It is said to have been first rendered by Tansen, that myths claim sang for Akbar. Amongst Bollywood composers, it was the most liked and widely used by none other than C Ramchandra, who really found it easy to make unforgettable melodies out of. The maestros use it in Shadav-Sampoorna as well as Audav-Sampoorna forms.

I will start with a common version of a very popular ghazal by Ghulam Ali, based on the raag: https://youtu.be/9Xb3ULyBKwQ

The ghazal by Rifat Sultan are fabulous.

बहारों को चमन याद आ गया है…… रिफ’अत सुलतान

बहारों को चमन याद आ गया है
मुझे वो गुल-बदन याद आ गया है

लचकती शाख़ ने जब सर उठाया
किसी का बाँकपन याद आ गया है

मिरी ख़ामोशियों पर हँसने वालो
मुझे वो कम-सुख़न याद आ गया है

तुम्हें मिल कर तो ऐ यज़्दाँ-परस्तो
ग़ुरूर-ए-अहरमन याद आ गया है

तिरी सूरत को जब देखा है मैं ने
उरूज-ए-फ़िक्र-ओ-फ़न याद आ गया है

किसी का ख़ूबसूरत शे’र सुन कर
तिरा लुत्फ़-ए-सुख़न याद आ गया है

मिले वो अजनबी बन कर तो ‘रिफ़अत’
ज़माने का चलन याद आ गया है

As is usual with these legendary giants of the genre, there are multiple, equally good renditions of varying lengths from live concerts, each one as enjoyable and exquisite as the other. Listen to this one, apparently the first time he sang it (in a concert, or could be, going by his narration, the first time ever!): https://youtu.be/wU53JNsMHqY

Listen to this sublime rendition by the maestro, my most favourite instrumentalist with this magical piece, by the man who made me believe in the divinity of music of Shrikrishna when he created mass hypnosis with the same. Maybe the Lord’s favourite son was sent to hypnotize our generations: https://youtu.be/L5D_m71yTF8

This one has Fazal Qureshi, Ustad Alla Rakha’s son on the tabla. All three of them are just fabulous and worthy claimants to the father’s throne, or shall I say, tabla?

Enjoy the three clips, folks. They will undoubtedly give me much joy and peace tonight. Stay healthy and happy