काल सकाळी अरुणाने तिला व्हाट्सएपवर आमच्या भाचीने पाठवलेली छायाचित्रे दाखवली. शिपोशी नावाच्या गावी तिच्या वडिलांनी नुकतेच त्यांच्या घराचे नूतनीकरण केले आहे.
कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील हे छोटेसे खेडे आहे. त्यामुळे जांभ्या दगडात बांधलेले टुमदार घर आहे. त्याची चित्रे इतकी मोहक आहेत की बऱ्याच आठवणींना उजाळा मिळाला.
मी दहावीतून अकरावीत (त्याकाळी शाळेचे शेवटचे वर्ष अकरावीचे असे) जातानाची उन्हाळी सुट्टी आठवली. त्या सुटीत मी, माझा मावसभाऊ व त्याचा चुलत काका, म्हणजे सुरेशकाका पुण्याहून एस टी बसने ( “लाल डबा”) लांज्याला गेलो, रात्रभर झालेल्या दिव्य प्रवासाने आमची अंगे चांगलीच आंबली होती. त्याकाळी रस्ते (काँग्रेसच्या राज्यात आणखी काय अपेक्षा ठेवणार म्हणा!) एकदम दिव्य होते, म्हणजे खड्डा कधी संपला आणि रस्ता कधी सुरू झाला ते कळू नये अशा कौशल्याने तयार केलेले असत. त्यामुळेच १० वी इयत्ता पास झालेल्या मला शरीरात एकूण २०६ हाडे आहेत व ती नेमकी कुठे कुठे आहेत त्याचे दिव्यज्ञान तेव्हाच मिळाले. बहुधा मी माझा व्यवसाय निवडण्यात या प्रवासाचा मोठा वाटा असावा. अर्थात “वाईटात चांगले पहावे” हे बाळकडू मिळाल्याने मी असे म्हणत असेनही, पण माझा मावसभाऊ (जो माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे आहे) सुद्धा डॉक्टर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ झाला. त्यामुळे कदाचित त्यालाही हेच ज्ञान प्राप्त झाले असावे. (तसा तो त्याकाळी कुंभकर्ण वगैरेंच्या पठडीतला होता, शनिवारी मुलांची पेरुगेट भावे स्कूल सकाळची असे, त्यामुळे त्याला शनिवारी सकाळी लवकर झोपमोड व्हायची. हा पठ्ठा सुमारे ११३०-१२ ला घरी येऊन दप्तर कोपऱ्यात टाकून झोपी जायचा, जेवणाची वेळ झाली की त्याला आम्ही उठवायचो, जेवून घोरासुराचे आख्यान पुढे सुरू राहायचे, ते सोमवार सकाळपर्यंत!! आणि त्या रात्री संबंध लाल डब्यातील प्रवास त्याने घोरूनच पार पाडला होता, त्यामुळे त्याला कदाचित छोटा आकडा वाटला असेल.) सुरेशकाका चे आजोळ कोलधे म्हणजे साक्षात झांशीच्या राणी लक्ष्मीबाई चे जन्मस्थान! लग्नापूर्वीची ती मनू तांबे होती. त्याच घराण्यातील मला माहित असलेली सर्वात प्रेमळ बाई म्हणजे आमची काकूआजी म्हणजे सुरेशकाकाची आई. या थोर साध्वीने तिला भेटलेल्या सर्वांवर निरलस प्रेमच केले. कोणीही एकदा घरी येईल त्याच्या आवडीच्या गोष्टी व्हायलाच पाहिजेत. तिच्यावर त्यामुळे सर्वांचेच प्रेम. अजातशत्रू वगैरे असलेली ही खऱ्या अर्थाने मायाळू बाई. मी एक वर्ष आईवडिलांना सोडून चौथीच्या वर्गात असताना मी पुण्यात मावशीच्या घरी होतो, तेव्हा मावशी व काकूआजी या दोघींनी मला जितके प्रेम दिले ते कदाचित माझ्या आईनेही दिले नसते.

घर पाहून मला एक माझ्या मावशीचे आवडते गाणे आठवले. ४०-५० च्या दशकात कोल्हापूर ला राहून राजाराम कॉलेज सर्वच क्षेत्रे गाजवलेली माझी मोठी मावशी सर्वच अर्थाने माझ्या आईच्या भावंडांना त्यांच्या (अकाली मृत्युमुखी पडलेल्या) आईच्या ठिकाणी होती. मला (आणि आम्हां सर्वांनाच) माझ्या मावसोबांबद्दल जेव्हढा भीतीयुक्त आदर असे, तेव्हढेच मावशीबद्दल प्रेम. तिला पाहून मराठीत “माय मरो पण मावशी जगो” अशी म्हण का आली आहे ते कळे.
योगायोगाने गायिकेचे नाव आणि माझ्या मावशीचे सासरचे नाव एकच म्हणजे मालती. पुढे आयुष्यात मालतीबाई पांडेंचा भेटीचा आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्तींना भेटण्याचा योग येईल असे तेव्हा, माझ्या लहानपणी कोणालाही वाटले नव्हते. https://youtu.be/TnIMS7Nnz8k
मराठी रसिकांच्या मनावर आणि भावविश्वावर राज्य केलेल्या गायिकांपैकी मालतीबाई पांडे या खूप मोठ्या भावगीत गायिका! माणिकताई वर्मा आणि मालतीबाई म्हणजे मराठी भावगीतं जनमानसात रुजविण्याऱ्या दोन दैवी आवाज. त्याकाळी संगीत रचना खऱ्या अर्थाने सुश्राव्य असत. साधी, सोपी, अर्थपूर्ण शब्द, साधी पण सुमधुर चाल व रचना, आणि सरळ मनाला भिडणारे गाणे. एकदा ऐकले की विसरणे केवळ अशक्य! ऑल इंडिया रेडिओवर ही गाणी आपण सर्वांनी खूप ऐकली आहेत.
कवी अनिल भारती यांची ही सरळ सोपी, पण अविस्मरणीय रचना..
आज अचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू ।।धृ।।
पूर्व दिशेला नदी वाहते
त्यात बालपण वाहत येते (मालतीबाई यांनी याचा उच्चार वहात असा केला आहे)
उंबरठ्याशी येऊन मिळते
यौवन लागे उगा बावरू
माहेराची प्रेमळ माती
त्या मातीतुन पिकते प्रीती
कणसावरची माणिकमोती
तिथे भिरभिरे स्मृती पाखरू
आयुष्याच्या पाऊलवाटा
किती तुडविल्या येता-जाता
परि आईची आठवण येता
मनी वादळे होति सुरू
हे गाणे आज मनात घर करून बसले आहे. त्यात भर म्हणजे आमची भाची वर्षाने भाजीचा फणस अगदी चिरून, उकडून दिला आणि त्याबरोबर कुळीथाचे पीठ! गेल्या कित्येक वर्षांत इतका मऊ, खऱ्या अर्थाने लुसलुशीत फणस खाल्ला नाही की इतके बारीक दळलेले कुळीथाचे पीठ खाल्ले नाही! त्यामुळे आमच्याकडचे तिघेही भोजन भाऊ तृप्त होऊन वर्षाला आशीर्वाद देऊन मोकळे! देशावरील लोकांना हे पदार्थ कदाचित ऐकूनही माहीत नसतील, पण कुळीथ खूप पौष्टिक कडधान्य आहे.
गरम गरम भात, त्यावर कुळीथाचे पिठले , साजूक तूप, म्हणजे स्वर्गसुखच! झक मारत गेली पंचतारांकित हॉटेलमध्ये मांडलेला १५० पदार्थांची मेजवानी! मला कोलध्यामध्ये चुलीवर मातीच्या भांड्यात केलेला भात आजही पन्नास वर्षानंतर आठवतोय! त्यावरची खमंग खरपुडी तूप मीठ लावून खाण्यासाठी आमची चढाओढ लागे- कशाला हवे चितळे बंधू आणि कशाला हवे काका हलवाई? त्यांच्या एकाही मिठाईची सुरेशकाकाच्या वयोवृद्ध आजीने प्रेमाने वाढलेल्या भातावर आलेल्या खरपुडी-तूप-मिठाशी तुलना सुद्धा होऊ शकते का?
तर असे हे खेड्यामधले घर कौलारू! कितीही महालात राहिलो तरी काका तांब्यांच्या घरच्या पडवीत कांबळी टाकून आलेली झोप जास्त सुखद वाटते अजूनही. https://youtu.be/iX9ejbnPG8A
एक छायाचित्र, फणसाची अप्रतिम भाजी, गरम गरम भात आणि कुळीथाचे पिठले! मन कोकणातील त्या सुट्टीच्या आठवणीत परत गेले.
लोकहो, काळजी घ्या, चिनी विषाणूने उडवलेला हाहाकार कमी झाला असला तरी गाफील होऊ नका! अजून रात्र वैऱ्याचीच आहे असे समजून काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही. शुभरात्री!!
ता.क.
विवेकजी यांनी उल्लेख केलेले “ऊन-पाऊस” या चित्रपटातले गाणे खरोखरच ग.दि. माडगूळकर यांनी रचले आहे, बाबूजींनी मालतीबाई यांच्या गाण्यासारखीच चाल बांधली आहे. चित्रपटात ते आशा भोसले यांनी गायले आहे: https://youtu.be/rCqJLeMFMMk
ग दि माडगूळकर यांनी मूळ गाण्यातील फक्त तीन शब्द घेऊन पूर्णपणे वेगळी रचना केली आहे:
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !
हिरवी श्यामल भवती शेती
पाउलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती, जुइ शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू !
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळु, ये कुरवाळू
दूरदेशिंचे प्रौढ लेकरू !
दोन्हीं रचनांमधील पहिल्या तीन शब्द व चालीचे साधर्म्य पाहून संभ्रम होणे स्वाभाविक आहे, म्हणून ही पुस्ती जोडली आहे
58 replies on “एका घराची कहाणी….”
Kya baat hai👍
Uttam athvani
Atiuttam pane rekhatlya ahet
🙏👍
LikeLiked by 1 person
धन्यवाद प्रविणजी
LikeLike
एक छायाचित्र, फणसाची अप्रतिम भाजी, गरम गरम भात आणि कुळीथाचे पिठले! मन परत कोकणातील त्या सुट्टीच्या आठवणीत परत गेले.
सर् तुम्ही मला देखील नोस्टॉल्जिक् केलेत
अप्रतिम लेख🙏🏻
LikeLiked by 1 person
धन्यवाद प्रशांत
LikeLike
तुम्ही केलेले शब्दप्रयोग , वर्णन, आणि बारीक निरिक्षण, वाचायला खुपच मज्जा आली, मस्तच लिहीता.
अहाहा…. खेड्यामध्ये घर कौलारू…..
You have a great sense of humour 😂😂खुपच करमणूक झाली…
Thanks for sharing Sir.
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
Dear Kaka,
Apratim Rachana Khedyamadhle Ghar… Aani tumchya aathavani suddha chaan lihilya aahet…ST pravas khadkhadat aawajachi aathavan zali..
Kokan trip in summer season is a wish now a days….kaularu ghare he khup inviting aastat…
And more so कुळीथाचे पिठले 😋 vachun tar punha bhuk lagli 🙂
Sharing above for your wonderful amd inspiring writing Kaka !
LikeLiked by 1 person
धन्यवाद कुणाल
LikeLike
डॉक्टरसाहेब,
आपण सगळेच अशा मवशी बरोबर रहात असायचो. असेच प्रेमळ व्यक्तीमत्व सर्वांनी अनुभवले आहे .आपले वर्णन वाचून पूर्वीचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले.
अनीता रोंघे .
LikeLiked by 1 person
खरे आहे, तेच प्रसंग थोडयाबहुत फरकाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येत होते.
LikeLike
छान आठवणी. कुळदाची पिठी आठवडयात एकदा तरी खाल्ल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. फणसाची भाजी हंगामी आहेच.
LikeLiked by 1 person
खरे आहे, त्याची चव निराळीच आहे
LikeLike
Khupach Sunder
Sort of nostalgic as my grandparents used to stay at Shreevardhan with similar house
पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी आम्ही नातवंडं तिथेच enjoy
Karayacho!!
Ambe, fanas, sandane, Kokam sarbat
Maubhat with tup and mith and pohyacha papad on keliche darache paan
अतिशय suramya आठवणी
गेले ,ते दिन गेले!!
LikeLiked by 1 person
धन्यवाद डॉ डांगे. ते दिन कोठेच जात नाहीत, मनाच्या आतील कप्प्यात आपण जपून ठेवलेले असतात
LikeLike
उत्तम पणे रेखाटलेले खेड्यातले घर आहे गोड आठवणी व सोबतीला सुंदर भावगीत. शिपोशी गावाच्या आठवणी ताज्या झाल्या.
LikeLiked by 1 person
धन्यवाद उदय
LikeLike
🙏🏻🙏🏻🙏🏻 नितांतसुंदर लेखन.. कविता एक नंबर…मला आजपर्यंत वाटत होते हे गदिमांचे ऊनपाऊस याचित्रपटातील गीत..ज्ञानात भर पडली..
सहज सुचणे आणि ते इतुक्या सुंदरतेने व्यक्त करता येणे हे सर्वस्वी तुमचे यश.. कोल या गावाची सहल आम्हाला घडवल्या बद्दल धन्यवाद..सर तुम्ही उत्तम लेखक आहातच पण त्याबरोबरच आम्हा वाचकांचे अनुभव विश्व समृद्ध करीत आहात.
चौकट ती वर,बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
वृध्द काकणे करती किणकिण….
हे सारे स्मरले.. पुनः एकवार राजाभाऊ परांजपेंच्या ऊनपाऊसची आठवण आली…मालतीबाईंचा सुंदर आवाज, बाबूजींनी दिलेले अजरामर संगीत…
आता थोडे औध्दत्य…इतुक्या सुंदर लेखनात किंवा वाफाळलेल्या सुवासिक आंबेमोहोर भातात काँग्रेसचा उल्लेख खड्यासारखा वाटला..
सर कधीतरी राजाभाऊ परांजपे,गदिमा,सुधीरजी यांच्याबद्दल पण लिहा..
त्रिवार नमस्कार…आजचा दिवस या लेखाने बनला…🙏🏻🙏🏻
LikeLiked by 1 person
उन पाऊस चित्रपटात जे गाणे आहे ते गदिमां चेच आहे, फक्त पहिले तीन शब्द तेच आहेत: “खेड्यामधले घर कौलारू” बाकीची रचना पूर्णपणे वेगळी आहे. त्या गाण्यासाठी आशाबाईंचा आवाज वापरला आहे.
LikeLike
गाणे तर उत्तम आहेच पण लेख सुद्धा एकदम जमून आलाय. केवळ अप्रतिम.
LikeLiked by 1 person
धन्यवाद देवकी
LikeLike
खूप छान 👌👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद अजित
LikeLike
कोकणातील घरात नेऊन जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
LikeLiked by 1 person
धन्यवाद अशोक
LikeLike
अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दात एका प्रेमळ नात्याचं वर्णन केले आहे. मीही कोकणातलाच असल्याने हे सर्व सहज समजू शकतो. कुळथाच्या पिठल्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले.
LikeLiked by 1 person
या घरी, एकत्र खाऊ या
LikeLike
वाह!! खेड्यामधलें घर कौलारू 👌👌👌👌
तुम्हीं लिहिलेले कोकणातील एस टी म्हणजेच लाल डब्यातील प्रवासाचे वर्णन वाचून पुलं च्या म्हैस या कथेची आठवण झाली😀
सुदैवाने माझे आई आणि बाबा यांची नाळ कोकणाशी जोडलेली आहे त्यामुळे आमचीही…..
त्यामुळे माझ्या लहानपणीच्या कैक उन्हाळी सुट्ट्या आम्ही आजोळी आणि पणजोळी घालवल्या…..
तुमच्या लेखनातून तो आठवणींचा दरवळ पुन्हा अनुभवला….. कापा फणस, बरका फणस, बरक्या फणसाचा माझ्या आजीने आजोळी निगुतीने आणि कष्टाने काढलेला रस …..घरी जात्यावर काढलेल्या भाताच्या कण्या आणि त्याची केलेली गरम गरम वाफाळलेली सांदणे आणि त्यावर साजूक तूप….क्या बात है……आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडीची……
तुम्हीं उल्लेखलेली सगळ्या कोकणातल्या पदार्थांची यादी अनेक वेळा मन आणि जिव्हा तृप्त करून गेली आहे आणि अजूनही करतआहे….. मऊ भात, तूप मीठ, भातावरची खरपुडी, आंबोशी चे लोणचे, करवंदाच्या जाळीतून काढून खालेल्ली करवंद, रातांबे…..
तुमच्या सुंदर वर्णनातून हे सगळे पुन्हा समोर उभे राहिले….
योगायोगाने माझ्या आजीचे (बाबांच्या आईचे) नाव सुद्धा मालती…..तिच्या तोंडी हे गाणे गुणगुणताना तिला खूप वेळा लहान पणी ऐकले आहे…..माझ्या दोन्ही आज्याना गाण्याची आवड.. मालती पांडे यांच्या आवाजाला एक सोज्वळ आपलेपणाची , घरगुती पणाची गोडी आहे….असे आपले मला वाटले…
एकूणच खूप सुंदर लेखन आणि गाणे….
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अनिरुद्ध सर तुमचे💐🙏🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद! अशोकच्या आईचे नाव आज कळले बघ.
LikeLike
सुंदर लिखाण व अप्रतीम गाणे व आवाज. मी सुद्धा योगायोगानं आजच आमच्या आजोळी सखरप्यास नवीन बांधलेल्या घरास भेट देणार आहे. 👍🏻
LikeLiked by 1 person
वा! क्या बात है! फणस आण, भाजी परत एकदा करू
LikeLike
खूप छान वर्णन सर
LikeLiked by 1 person
धन्यवाद निलेश
LikeLike
अप्रतिम… कोकणात सफर करून आल्याचा सारखं वाटलं…आठवणी मनात घर करतात हेच खरं…
LikeLiked by 1 person
अगदी खरे आहे
LikeLike
डॉ.अनिरुद्ध,
तुम्ही उत्तम चिकित्सक व प्रख्यात हृदयरोगतज्ञ आहात हे ज्ञात होते,पण तितकेच चांगले लेखक आहात ह्याची प्रचिती येत आहे.तुमच्या स्मरणशक्ती स माझा सलाम!! शरीराने पुण्यात असलो तरी मनाने पूर्ण कोलध्यात,तूप मीठ व आटवल बरोबर कधी मेतकूट तर कधी डांगर,अहाहा !!कै.माईआजीबरोबर फणसाचे गरे तळताना व आगरातील जमिनीवर पडलेले बिटकी आंबे तीथेच चुपून खातानाच्या आठवणी जागृत झाल्या.आठवावं व लेखावे तेवढे कमीच !!,अती रम्य भूतकाळ,तेवढेच छान लिखाण, धन्यवाद 🙏
LikeLiked by 1 person
धन्यवाद रवि!! अहो जाहो कशाला??
LikeLike
veena.gurjar58@gmail.com
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
Hallo Anniruddha, i hv visited Koldhey two three times, i too hv sweet memories. Your write up always perfect
LikeLiked by 1 person
हे वाचले आणि वाचताना त्या काळात वातावरणात वावरत असल्याचे जाणवले हा आनंद मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद
LikeLiked by 1 person
धन्यवाद सर्वप्रथम तुला, सुरेशकाका. तुझ्यामुळे मी तिथे जाऊ शकलो
LikeLike
धन्यवाद वीणा वहिनी
LikeLike
Amazing lekh Doctor! Amcha pidhi ni ‘khedya madhle ghar kaularu’ anubhavlele nahi. Video games, five star hotels madhe brunch, all digital devices like iPad, laptop, Android phones he sagla milala. Pan this part is missing! Varnan wachun pan khup chan watla. ‘Itka stress free ayusha asu shakta’, ‘ajji ni, kaku ni wadhlelya tup bhat ani kultha cha pithlyawar nivant tav marnya sathi sutti milun chan 8 15 diwas kaularu gharat rahayla jata yeta’ he sagla imagine karun pan khup chan watla. Totally refreshing ! Keep writing! Keep giving such treats to all of us ! 🙏
LikeLiked by 1 person
Bilwa priorities do change with times. But some things of beauty are permanent
LikeLiked by 1 person
That’s true 🙏 may be I am too young to comment on this ! But yes! With the passage of time, I will also realise the same !
LikeLiked by 1 person
You might, but then again , the evolution of one’s thoughts is such a variable phenomenon
LikeLike
Dada, Khup sundar lihile ahes. Khup purvi ghadun gele asale tari aattach jaun aalya sarkhe Taje likhan vatate ahe.
Aamhi pan baban barobar dar varshi jaycho tyachi aathavan yete. Ajunahi jato, pan to majja ch vegali hoti !!
Khup chhan 👌
LikeLiked by 1 person
धन्यवाद गिरीजा
LikeLike
आमच्या लहानपणी चं हे फेवरीट गाणं!
कोकणाचं वर्णन एकदम कडक!
लहानपणी च्या आठवणी नयनरम्य!
अप्रतिम लेख!
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
आमच्या लहानपणी चं हे फेवरीट गाणं!
कोकणाचं वर्णन एकदम कडक!
लहानपणी च्या आठवणी नयनरम्य!
अप्रतिम लेख!
LikeLiked by 1 person
धन्यवाद शेखरदादा
LikeLike
तुझा लेख वाचून मी साखरप्यास पोहोचले.
LikeLiked by 1 person
Wonderful. Let’s go
LikeLike
खेड्यामधल्या घराचं मनोहारी चित्रण
मला रूढार्थाने गाव नाही . पण माझ्या आजीने कोकणातल्या सगळ्या पदार्थांची चव आम्हाला मुंबईत चाखवली. माझी आजी जात्याच सुगरण ! तिच्या हातची फणसाची भाजी आणि कुळीथाचं पिठलं लाजवाब असे.
आणि खरपुडी म्हणजे माझा अत्यंत प्रिय पदार्थ . आजकाल हे नाव पण कोणाला माहित नसेल. कोकणची मस्त सफर झाली
LikeLiked by 1 person
खरे आहे डॉ कामत, कुकरमध्ये भात लावल्यावर खरपुडी कुठून येणार?
LikeLike
खूप सुंदर लिहिलं आहे सर. डोळ्यासमोर कोकण उभा राहिला. आणि किती सुंदर बालपणीच्या आठवणी आहेत.
LikeLiked by 1 person
Thanks. Glad you liked it
LikeLike